Prashant Kishor Wins Bankipur Assembly : बिहारच्या बांकीपूर विधानसभा जागेचा निकाल जाहीर झाला आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (PK) आता जन सुराज पार्टीकडून आमदार झाले आहेत. त्यांनी मोठ्या मताधिक्याने ही पोटनिवडणूक जिंकली आहे.

पाटना : बिहारच्या बांकीपूर विधानसभा जागेवर मतदानापासून निकालापर्यंत सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं. कारण इथे मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आणि झालंही तसंच. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या बालेकिल्ल्यात जन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर पहिल्यांदाच निवडणूक जिंकून आमदार झाले आहेत.

१८,९५३ मतांनी प्रशांत किशोर विजयी

प्रशांत किशोर यांनी बांकीपूरची जागा तब्बल १८,९५३ मतांनी जिंकली आहे. त्यांना एकूण ६३,२०३ मतं मिळाली, तर भाजपचे उमेदवार नीरज कुमार यांना ४४,२५० मतांवर समाधान मानावं लागलं. आरजेडीच्या रेखा गुप्ता तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. बांकीपूर हा भाजपचा गड मानला जातो. ही जागा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची पारंपरिक जागा आहे. ते इथून पाच वेळा आमदार राहिले आहेत. त्यांच्या आधी त्यांचे वडील इथून निवडणूक जिंकायचे. पण आता प्रशांत किशोर इथले नवे आमदार आहेत.

१. जन सुराज यात्रा

जाणकारांच्या मते, प्रशांत किशोर यांच्या विजयाचं पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे त्यांची 'जन सुराज यात्रा'. गेल्या काही दिवसांत त्यांनी संपूर्ण बिहारमध्ये फिरून लोकांची मनं जिंकली आणि एक मजबूत संघटन उभं केलं. कार्यकर्त्यांचं हेच नेटवर्क मतांमध्ये बदललेलं दिसलं.

२. तरुण मतदारांशी थेट संवाद

प्रशांत किशोर स्वतः उच्चशिक्षित आहेत आणि त्यांना तरुणांचे प्रश्न चांगलेच माहिती आहेत. त्यामुळे, बिहारमधील तरुण ज्या मुद्द्यांवरून सरकारविरोधात नाराज आहेत, त्याच मुद्द्यांवर त्यांनी भर दिला. रोजगार, शिक्षण आणि उत्तम प्रशासन यावर बोलून त्यांनी तरुणांना आपल्या बाजूने वळवलं. याचा थेट फायदा त्यांना विजयात झाला.

३. अचूक रणनीती आणि योग्य मुद्दे

प्रशांत किशोर यांना एक उत्तम निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळखलं जातं. याचा फायदा त्यांनी स्वतःच्या जागेवर पुरेपूर उचलला. त्यांनी शहरापासून गावापर्यंत सरकारविरोधातले तेच मुद्दे उचलले, ज्याबद्दल लोकांमध्ये राग होता. योग्य रणनीती आखून त्यांनी मतदारांना आकर्षित केलं आणि निवडणूक जिंकली.

४. स्वतः 'सुशासन' आणि विरोधक 'भ्रष्ट'

निवडणूक रणनीतीकार ते नेता बनलेल्या प्रशांत किशोर यांनी स्वतःला विकास आणि सुशासनाचा चेहरा म्हणून सादर केलं. दुसरीकडे, बिहारमधील सध्याचं सरकार आणि लालू यादवांच्या पक्षाला पारंपरिक राजकारण करणारे आणि भ्रष्टाचारी ठरवून त्यांनी लोकांना आपल्याकडे खेचून घेतलं.

५. स्थानिक मुद्द्यांवर जास्त भर

प्रशांत किशोर यांनी बांकीपूरच्या सध्याच्या परिस्थितीवर बोट ठेवलं. 'तुमच्या शहरात असं काय झालंय की तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला मत द्याल?' असा थेट सवाल त्यांनी लोकांना केला. जातीय समीकरणांसोबतच त्यांनी रस्ते, शिक्षण, आरोग्य, वाहतूक आणि शहरी विकासासारख्या स्थानिक प्रश्नांना प्राधान्य दिलं.

अनेक मुख्यमंत्री आणि मोदींसाठी प्रशांत किशोर यांनी बनवलीये रणनिती

२०२४ मध्ये आपला 'जन सुराज' पक्ष सुरू करण्यापूर्वी प्रशांत किशोर एक निवडणूक रणनीतीकार होते. त्यांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी काम केलं आहे. इतकंच नाही, तर ममता बॅनर्जींपासून ते विजय थलपथी आणि अरविंद केजरीवाल यांच्या विजयातही त्यांची महत्त्वाची रणनीती होती. भारतात अनेक राज्यांमध्ये त्यांनी आपल्या प्लॅनिंगने सरकारं बनवली आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपसाठी रणनीती आखली होती, तेव्हा ते पहिल्यांदा चर्चेत आले. त्यांच्यामुळेच नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपला पूर्ण बहुमत मिळालं होतं. आता ते पहिल्यांदाच निवडणूक लढले आणि आमदारही झाले.