Kitchen Hack : एकमेकांत अडकलेली स्टीलची भांडी काढण्याची सोपी ट्रिक!
अनेकदा स्टीलची भांडी, वाट्या किंवा ग्लास एकमेकांत घट्ट अडकतात. ते सहजपणे आणि सुरक्षितरित्या वेगळे कसे करायचे, याची सोपी ट्रिक इथे जाणून घ्या.
15
Image Credit : Social Media
सोपी वैज्ञानिक पद्धत
स्वयंपाकघरात भांडी धुताना किंवा ठेवताना दोन स्टीलच्या वाट्या, ग्लास एकमेकांत घट्ट अडकतात. व्हॅक्यूममुळे (Vacuum) ते खेचूनही निघत नाहीत. अनेकजण भांडी जमिनीवर आपटतात किंवा सुरीने काढायचा प्रयत्न करतात. यात भांड्यांचे नुकसान होते किंवा हाताला इजा होऊ शकते. गरम पाण्यानेही भांडी निघत नसतील, तर ही सोपी वैज्ञानिक पद्धत वापरा.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

25
Image Credit : Social Media
चिमट्याने घट्ट पकडा
अडकलेली भांडी थेट हाताने उचलू नका. एक मजबूत चिमटा (Sandasi) किंवा जाड सुक्या कापडाने भांड्यांची कडा घट्ट पकडा.
35
Image Credit : Getty
गॅसवर हलकेच गरम करा
गॅसची आच मंद (Low flame) ठेवून सुरू करा. खालच्या भांड्याच्या तळाला फक्त १० ते २० सेकंद आचेवर धरा. भांडं गोलाकार फिरवत राहा, जेणेकरून उष्णता सगळीकडे सारखी लागेल. लगेच गॅस बंद करा. आता जाड कापड किंवा ग्लोव्हज घालून वरचं भांडं हळूवारपणे फिरवून काढा. दोन्ही भांडी अगदी सहजपणे वेगळी होतील.
45
Image Credit : amazon
यामागे विज्ञान काय आहे?
हे भौतिकशास्त्राच्या 'थर्मल एक्स्पान्शन' (Thermal Expansion) म्हणजे 'उष्णतेमुळे प्रसरण पावणे' या तत्त्वावर काम करतं. जेव्हा आपण स्टीलला उष्णता देतो, तेव्हा ते थोडे प्रसरण पावते. गॅसवर ठेवल्यावर बाहेरचे भांडे आधी गरम होऊन प्रसरण पावते. यामुळे दोन्ही भांड्यांमधील व्हॅक्यूम (हवेचा दाब) नाहीसा होतो आणि भांडी ढिली होतात. त्यामुळे आतले भांडे सहज बाहेर येते.
55
Image Credit : amazon
ही काळजी नक्की घ्या (Safety Tips)
जास्त गरम करू नका: भांडं जास्त वेळ आचेवर ठेवल्यास स्टीलचा आकार बदलू शकतो किंवा ते काळे पडू शकते. फक्त १५-२० सेकंद पुरेसे आहेत. रिकाम्या हातांनी स्पर्श करू नका: स्टील उष्णता लवकर शोषून घेते, त्यामुळे हाताला चटका बसू शकतो. नेहमी चिमटा किंवा जाड कापडाचा वापर करा. काचेच्या भांड्यांवर प्रयोग करू नका: ही ट्रिक फक्त स्टील किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यांसाठी आहे. काचेच्या भांड्यांना थेट आच दिल्यास ती फुटू शकतात.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

