MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Soft Idli Tips : आता इडली भांड्याला चिकटणार नाही! मऊसर इडल्यांसाठी वापरा ही सोपी ट्रिक

Soft Idli Tips : आता इडली भांड्याला चिकटणार नाही! मऊसर इडल्यांसाठी वापरा ही सोपी ट्रिक

घरी इडली बनवताना खालच्या प्लेटमधली इडली ओलसर आणि चिकट होते का? हॉटेलसारखी मऊ आणि सुटसुटीत इडली बनवण्यासाठी ही एक सोपी किचन हॅक नक्की ट्राय करा.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 10 2026, 12:03 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
इडलीच्या प्लेट्स योग्य पद्धतीने कशा लावायच्या?
Image Credit : pinterest

इडलीच्या प्लेट्स योग्य पद्धतीने कशा लावायच्या?

सकाळच्या नाश्त्यासाठी, गरमागरम, मऊ आणि जाईच्या फुलासारख्या इडल्या खायला कोणाला नाही आवडणार? पण अनेकदा पीठ चांगलं असूनही, इडल्या शिजल्यावर एकमेकांना चिकटतात आणि खालच्या प्लेटमधील इडल्या तर ओलसर आणि गिझगिझीत होतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे, बहुतेक लोक इडली स्टँडच्या प्लेट्स योग्य क्रमाने लावत नाहीत!
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
प्लेट्स लावताना नेमकी काय चूक होते?
Image Credit : Instagram

प्लेट्स लावताना नेमकी काय चूक होते?

साधारणपणे, इडली पात्रात पीठ घालून प्लेट्स एकावर एक ठेवताना, बहुतेक लोक त्या सरळ आणि समान ठेवतात. पण ही पद्धत चुकीची आहे. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे, कारण इडलीच्या प्लेट्सना वाफेसाठी लहान छिद्रं (steam holes) असतात.

Related Articles

Related image1
Sugar Side Effects : तुम्हाला अतिगोड पदार्थ खाण्याची सवय आहे? आरोग्यासंबंधित उद्भवू शकतात हे आजार
Related image2
तुम्ही रोज तूप खाता का? आरोग्यासंबंधित या असतील तर वेळीच सावध व्हा!
34
इडलीच्या प्लेट्स लावण्याची ही आहे योग्य पद्धत
Image Credit : Instagram

इडलीच्या प्लेट्स लावण्याची ही आहे योग्य पद्धत

पहिल्या प्लेटमध्ये पीठ टाकल्यानंतर, त्यावर दुसरी प्लेट ठेवताना, वरच्या प्लेटची छिद्रं खालच्या इडलीच्या बरोबर वर न येता बाजूला येतील, अशा पद्धतीने ठेवा. म्हणजे, एका इडलीवर दुसरी इडली थेट ठेवू नका. असं केल्याने, खालून येणारी वाफ त्या छिद्रांमधून सहजपणे वरच्या बाजूला जाते. यामुळे वाफेचे पाणी इडलीवर टपकून ती चिकट होत नाही. इडली खाली चिकटत नाही आणि सगळ्या इडल्या एकसारख्या शिजतात.
44
लक्षात ठेवा... पिठाची कन्सिस्टन्सी पण महत्त्वाची
Image Credit : magnific

लक्षात ठेवा... पिठाची कन्सिस्टन्सी पण महत्त्वाची

इडली कापसासारखी मऊ होण्यासाठी फक्त प्लेट्स योग्यरित्या ठेवणं पुरेसं नाही; पिठाची कन्सिस्टन्सीसुद्धा परफेक्ट असावी लागते. पीठ खूप पातळ किंवा खूप घट्ट असेल तर इडली कडक होऊ शकते. जेव्हा पीठ व्यवस्थित आंबलेलं आणि योग्य कन्सिस्टन्सीचं असेल, तेव्हाच ही ट्रिक वापरून तुम्ही परफेक्ट इडली बनवू शकता. पुढच्या वेळी घरी इडली बनवताना ही सोपी ट्रिक नक्की वापरा. बघा, इडली भांड्याला न चिकटता फुलासारखी टम्म फुगेल!

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Zodiac Forecast : गुरु चांडाळ दोषातून सुटका, समसप्तक योगाने 'या' 5 राशींना होणार प्रचंड धनलाभ
Recommended image2
Skin Health : चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवण्यासाठी 'हे' पदार्थ खा, त्वचा दिसेल तरुण आणि चमकदार
Recommended image3
Glowing Skin : चमकदार त्वचेसाठी कॉफीचे 5 सोपे उपाय, घरच्या घरी मिळवा पार्लरसारखा ग्लो
Recommended image4
Gold Necklace : 6 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे सोन्याचे नेकलेस, पाहा लेटेस्ट डिझाइन्स
Recommended image5
Kids Ethnic Wear : गणेश चतुर्थीला तुमच्या छोट्या परीसाठी खास ड्रेस; सणाचा आनंद होईल दुप्पट
Related Stories
Recommended image1
Sugar Side Effects : तुम्हाला अतिगोड पदार्थ खाण्याची सवय आहे? आरोग्यासंबंधित उद्भवू शकतात हे आजार
Recommended image2
तुम्ही रोज तूप खाता का? आरोग्यासंबंधित या असतील तर वेळीच सावध व्हा!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved