CJP Protest JP Nadda Meeting : केंद्रीय मंत्री जे.पी नड्डा यांनी आंदोलनकांनी आंदोलन थांबवावं असं आवाहन केलं आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या भेटीनंतर त्यांनी हे आवाहन केलं आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मागील जवळपास महिन्याभरापासून दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलन सुरू आहे. आज २० जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीकडून संसदेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठा गोंधळ झाला. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यादरम्यान सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी आंदोलकांनी हे आंदोलन थांबवावं असं आवाहन केलं आहे.

सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत काय घडलं? जे.पी. नड्डा काय म्हणाले?

कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत सीजेपीने आपल्या मागण्या सरकारकडे दिल्या आहेत. चर्चेचा पहिला प्रस्ताव आज सरकारकडे आला आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळासोबत भेटीदरम्यानची चर्चा अतिशय शांततापूर्ण झाली. आंदोलकांसोबत सकाळी ११.५० वाजल्यापासून आमची तोंडी चर्चा सुरू होती. त्यानंतर आंदोलकांकडून संध्याकाळी ४ वाजता लेखी निवेदन देण्यात आलं आहे, असं नड्डा म्हणाले.

तसंच आंदोलकांनी आपलं हे आंदोलन संपवावं असं आवाहन त्यांनी कॉकरोच जनता पार्टी आणि इतर आंदोलकांना केलं आहे. तसंच आंदोलन संपवून सध्याची परिस्थिती पुन्हा पूर्ववत करावी, यासाठी प्रशासनाला मदत करावी, असंही आवाहन त्यांनी केलं आहे.

जे.पी. नड्डा यांच्या भेटीनंतर कॉकरोच जनता पार्टीची प्रतिक्रिया

कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने जे.पी. नड्डा यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली. याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं, की सरकारने त्यांनी केलेल्या मागण्या, त्याचं म्हणणं गांभीर्याने ऐकून घेतलं आहे. आता भेटीदरम्यान केलेल्या मागण्यांचा विचार केला जाईल अशी आशा सीजेपीने व्यक्त केली आहे.

काय आहेत कॉकरोच जनता पार्टीच्या मागण्या?

मागील २३ दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करत असलेल्या सोनम वांगचुक यांची तात्काळ सुटका करावी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि नीट परीक्षेप्रकरणात ज्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना १ कोटी नुकसानभरपाई द्यावी, अशी तिसरी मागणी करण्यात आली आहे.