Sonam Wangchuk Hunger Strike Wife Gitanjali Petition in High Court : सोनम वांगचुक यांना सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्यात यावं, यासाठी त्यांच्या पत्नी गितांजली यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्त्ये सोनम वांगचुक हे मागील २१ दिवसांपासून अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि इतर मागण्यांसाठी ते दिल्लीतील जंतर-मंतर इथे २८ जूनपासून उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा २२वा दिवस आहे. काल शनिवारी त्यांच्या उपोषणाच्या २१व्या दिवशी त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आता त्यांच्या पत्नीने गितांजली यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सोनम वांगचुक यांच्या पत्नी गितांजली यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये सफदरजंग रुग्णालय आणि सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी लिहिलंय, सोनम वांगचुक यांना काहीही झालं, तर त्याची संपूर्ण जबाबदारी सफदरजंग रुग्णालय आणि सरकारची असेल. सफदरजंग रुग्णालयावर आपला विश्वास राहिला नाही. त्यामुळे सोनम वांगचुक यांना खाजगी रुग्णालयात हलवावं, खासगी रुग्णालयात त्यांना हलवण्यासाठी गितांजली यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

गितांजली यांनी यापुढे बोलताना सांगितलं, की रुग्णालयाने अशी माहिती दिली की सोनम यांच्या शरीरातील पोटॅशियमची पातळी २.९ पर्यंत खाली गेली आहे. ही पातळी जीवघेणी पातळी मानली जाते. मात्र रुग्णालयाने सार्वजनिकरित्या जी माहिती दिली त्या माहितीमध्ये या पातळीच्या आकड्याचा कोणताही उल्लेख केलेला नाही. केवळ पोटॅशिअमची पातळी कमी झाली असं सांगण्यात आलं आहे. मात्र एका स्वतंत्र्य लॅबमध्ये झालेल्या चाचणीत पोटॅशिअमची पातळी ३.५ इतकी असल्याचं समोर आलं आहे. ही पातळी सामान्य आहे.

Scroll to load tweet…

गितांजली यांनी आरोप केले आहेत, की सोनम वांगचुक यांना खाजगी रुग्णालयात हलवण्याची मागणी कुटुंबाकडून सतत करण्यात आली, मात्र तिथून सोडण्यातं आलेलं नाही. रुग्णालयातील सोनम यांच्या मजल्यावर ३० कर्मचारी, तर संपूर्ण रुग्णालय परिसरात १०० हून अधिक पोलीस तैनात आहेत. त्यामुळे सोनम यांच्या हालचालींवर निर्बंध आले असून तेथे उपचारांपेक्षा बेकायदेशीरपणे अडकवल्याचं वाटत आहे.

उपचारासाठी रुग्णालय निवडण्याचा अधिकार रुग्णाला, त्यांच्या कुटुंबाला असावा, त्यासाठी उच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीसाठी याचिका दाखल केली असल्याचं गितांजली यांनी सांगितलं आहे. सोनम यांना सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी मागत गितांजली यांनी उच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीची याचिका दाखल केली आहे.