Maharashtra Drought

Share this Video

चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदणी व मुद्रांक विभागाची कार्यालये पासपोर्ट कार्यालयांच्या धर्तीवर मॉडेल करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. पहिल्या टप्प्यात राज्यात 60 मॉडेल कार्यालये उभारली जाणार असून पुण्यात पहिले कार्यालय सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यालयात शासकीय अधिकारी असतील, तर इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर कर्मचारी खासगी असतील. नोंदणी विभागात आधुनिक आणि AI आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांसाठी अधिक चांगली व्यवस्था उभी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दुष्काळाच्या परिस्थितीबाबत मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाचे अधिकारी मंत्रिमंडळासमोर माहिती मांडतील आणि त्यानंतर आवश्यक निर्णयांवर चर्चा होईल, असे बावनकुळे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचाही त्यांनी दावा केला. मतदार यादीतील नावांबाबत काँग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्द्यावर सर्व पक्षांच्या बूथ लेव्हल एजंटना नावांची नोंद करण्याची संधी असल्याचे सांगत बावनकुळे यांनी काँग्रेसच्या भूमिकेला “पॉलिटिकल स्टंट” म्हटले. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या मिमिक्री आणि टीकेवरही बावनकुळे यांनी टीका केली. तसेच दुष्काळाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील वास्तव मांडावे आणि केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Related Video