नुकतंच प्राइम व्हिडीओने एक खास व्हिडीओ शेअर करत 2024 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या तब्बल 70 वेगवेगळे चित्रपट आणि वेब सीरिज यांची एक छोटीशी झलक दाखवली असून अभिनेता फरहान अख्तरने याचे पोस्टर देखील शेअर केले आहे
मराठी मालिकांमधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या अभिनय आणि तिच्या ज्वेलरी ब्रॅण्डमुळे चर्चेत असते. अशातच प्राजक्ता माळीने गुलाबी आणि काळ्या रंगाच्या शेडमधील साडीत एक कातिल फोटोशूट केले आहे.
बॉलिवूडमधील अभनेता टायगर श्रॉफ याने आलिशान नवे घर खरेदी केले आहे. याशिवाय घर भाड्याने दिले असून त्याचे प्रति महिन्याचे भाडे ऐकून तुम्ही अव्वाक व्हाल.
‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील मान्यवर कलाकार आणि आगळीवेगळी स्टोरी या चित्रपटुन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या २९ मार्च रोजी चित्रपट सर्वत्र प्रसिद्ध होणार आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका आजपासून दररोज रात्री १० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या प्रोमोने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
दहा वर्षे ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम अविरतपणे चालू होता. या कार्यक्रमातील सगळ्याच विनोदी कलाकारांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं.नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करत मालिकेने निरोप घेतला आहे.
प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव याच्यावर रेव्ह पार्ट्यांमध्ये दुर्मिळ सापांसह त्यांचे विष पुरवण्याचा आरोप होता. अशातच एल्विशने आपला गुन्हा मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सापाचे विष मनोरंजनासाठी, औषध म्हणून वापरण्याच्या प्रकरणात एल्विश यादव सह आणखी सहा जणांना अटक करण्यात आली होती.त्या प्रकणाच्या पुढील तपास पोलिस सध्या करत आहेत.
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट जुलैमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. त्याआधी १ ते ३ मार्च तीन दिवसीय विवाहपूर्व कार्यक्रमाचे आयोजन जामनगर येथे करण्यात आले होते.यामध्ये शाहरुख,अमीर आणि सलमान खानने एकत्र डान्स केला.
द क्रू' चित्रपट बऱ्याच प्रतीक्षेनंतर २९ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात तब्बू करीन कपूर खान आणि कीर्ती सेनन असून यांचा धमाकेदार अभिनय पाहायला मिळणार आहे.