टायगर श्रॉफने खरेदी केले नवे घर, प्रत्येक महिन्याचे भाडे ऐकून व्हाल अव्वाक

| Published : Mar 19 2024, 02:02 PM IST

tiger shroff buys 7 50 crore property in pune

सार

बॉलिवूडमधील अभनेता टायगर श्रॉफ याने आलिशान नवे घर खरेदी केले आहे. याशिवाय घर भाड्याने दिले असून त्याचे प्रति महिन्याचे भाडे ऐकून तुम्ही अव्वाक व्हाल.

Tiger Shroff New Home :  बॉलिवूडमधील आगामी सिनेमा ‘बडे मिया छोटे मिया’ मधील स्टार टायगर श्रॉफने पुण्यात एक आलिशान घर खरेदी केले आहे. या घराची किंमत तब्बल 7.50 कोटी रुपये असल्याचे रिपोर्ट्सनुसार सांगण्यात आले आहे. याशिवाय अभिनेत्याने घर भाड्यानेही दिले आहे. Zepkey च्या रिपोर्ट्सनुसार, टायगरने एका ब्रेवरेज कंपनीला 3.50 लाख रुपये प्रति महिन्याच्या भाड्याने प्रॉपर्टी दिली आहे.

कधी खरेदी केली टायगरचे प्रॉपर्टी?
रिपोर्ट्सनुसार, टायगरने 5 मार्चला एएसन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून संपत्ती खरेदी केली आहे. या प्रॉपर्टीसाठी टायगरने 52.50 लाख रुपये स्टॅम्प ड्युटीही दिली आहे. अभिनेत्याची प्रॉपर्टी 4248 स्क्वेअर फूट रुंद आहे. टायगरने खरेदी केलेले घर पुण्यातील हडपसर येथे आहे.

मुंबईत 35 कोटी रुपयांचे अपार्टमेंट
टायगर श्रॉफचे मुंबईत एक अपार्टमेंटही आहे. याची किंमत तब्बल 35 कोटी रुपये आहे. अभिनेत्याचे मुंबईतील अपार्टमेंट 8BHK चे असून येथे त्याची आई आणि बहिण राहते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टायगर 248 कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीचा मालक आहे. सिनेमांव्यतिरिक्त टायगर ब्रॅण्ड एंडोर्समेंटच्या माध्यमातून कमाई करतो.

टायगरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास वर्ष 2023 त्याच्यासाठी खास नव्हते. त्याचा 'गणपत' सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोसळला होता. आता टायगर श्रॉफ त्याचा आगामी सिनेमा 'बडे मियां छोटे मिया' मध्ये झळकणार आहे. सिनेमा ईदनिमित्त 10 एप्रिलला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : 

प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवने पार्टीसाठी सापाचे विष पुरवत असल्याची दिली कबुली, सूत्रांची माहिती

अश्लील कंटेटच्या या 18 OTT प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने घातली बंदी

TMKOC मालिकेतील अभिनेत्री मुनमुन दत्ता व राज अनादकट यांनी गुपचुप उरकला साखरपुडा?