सार

दहा वर्षे ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम अविरतपणे चालू होता. या कार्यक्रमातील सगळ्याच विनोदी कलाकारांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं.नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करत मालिकेने निरोप घेतला आहे.

एंटरटेनमेंट डेस्क : गेल्या 10 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्राला नव्हेच तर परदेशातही प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या "चला हवा येऊ द्या" मालिकेने निरोप घेतला आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवर गेल्या दहा वर्षे ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम अविरतपणे चालू होता. या कार्यक्रमातील सगळ्याच विनोदी कलाकारांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. नुकताच मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला. 10 वर्षांनी मालिका निरोप घेणार म्हटल्यावर सगळेच कलाकार आणि या मालिकेतील प्रत्येक घटक अत्यंत भावुक झाला होता. यावेळी सगळ्यांचेच डोळे पाणावले होते .या बद्दल प्रसिद्ध अभिनेता कुशल बद्रिकेने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

View post on Instagram
 

या पोस्टच्या माध्यमातून कुशल याने आपली भावना आणि प्रेक्षकांकडून मिळाले प्रेम यावर कृतज्ञता व्यक्त करत "निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, चुकले काही आमुचे तर क्षमा असावी' असे गाणे लावले आहे.“माय बाप प्रेक्षकहो, सगळ्यांचे मनापासून आभार…चूक भूल द्यावी घ्यावी” असं कॅप्शन कुशल बद्रिके त्याने या पोस्टला दिलं आहे.

तसेच या पोस्ट वर अनेक भावनिक कंमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत."यामध्ये एक व्यक्तीने लिहिले आहे की, "थकलेल्या जीवात जीवंतपणा आणण्याचे काम तुम्ही केले,नाराज ,दु:खी ,आजारी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम तुम्ही सर्वांनी केले, त्याबद्दल मनापासून आभार". तर अनेकांनी हा कार्यक्रम नको बंद व्हायला असे देखील म्हंटले आहे. यातून या मालिकेची लोकप्रियता केव्हढी आहे हे लक्षात येते.