तीन सुना मिळून शोधताय परफेक्ट सासू! ‘नवरी मिळे हिटलरला’ नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

| Published : Mar 18 2024, 07:25 PM IST / Updated: Mar 18 2024, 08:52 PM IST

navari mile hitler la

सार

‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका आजपासून दररोज रात्री १० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या प्रोमोने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

 

Entertainment : छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नव्या मालिका सज्ज झाल्या आहेत. यातच ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेला आजपासून म्हणजेच १८ मार्चपासून सुरु होत आहे. या मालिकेतून काही जुनेच आणि गाजलेले कलाकार एका वेगळ्या आणि हटके भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आपल्या हिटलर पण तरुण सासऱ्यासाठी सासू शोधायला निघालेल्या तीन सुनांची कथा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक मालिका पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका आजपासून दररोज रात्री १० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या प्रोमोने चाहत्यांची उत्सुकता वाढवली तर आहेच मात्र राकेश बापट सासऱ्यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार असल्याने अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मालिकेच्या या टीझर प्रोमोमध्ये सासऱ्याचा असलेल्या पात्राचा ‘हिटलर’ अंदाज पाहायला मिळाला आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या नावात ज्याप्रकारे हिटलरचा उल्लेख केला गेला आहे, त्याच प्रकारे या मालिकेतील मुख्य पात्र म्हणजेच अभिराम हा देखील अगदी हिटलर आहे. प्रत्येक गोष्टीत परफेक्शन लागणारा अभिरामच्या आयुष्यात बिनधास्त पण धसमुसळी लीला एन्ट्री करणार आहे. आता या लीलाशी अभिरामचे गुण जुळतील का? हे पाहायला प्रेक्षकांना मजा येणार आहे.

राकेश बापट मुख्य भूमिकेत :

हिंदी मालिकांमधून प्रत्येकाच्या मनात घर करणार अभिनेता राकेश बापट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राकेश बापट याला मराठीत पाहण्यासाठी त्याचे चाहते देखील आतुर झाले आहेत. यासोबत या मालिकेत वल्लरी शिंदे, भुमिजा पाटील, शर्मिला शिंदे आणि सानिका काशीकर या देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

आणखी वाचा :

झी मराठी वाहिनीवर 10 वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या मालिकेने घेतला निरोप...

Oscars 2024 च्या मंचावर कला दिग्दर्शक नितिन देसाई यांना वाहिली श्रद्धांजली

Dolly-Amandeep Sohi Death : बहिणीनंतर डॉली सोहीचे गर्भाशयाच्या कॅन्सरने निधन, मृत्यूनंतर अभिनेत्रीही इंस्टाग्रामवरील अखेरची पोस्ट व्हायरल