सार

नुकतंच प्राइम व्हिडीओने एक खास व्हिडीओ शेअर करत 2024 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या तब्बल 70 वेगवेगळे चित्रपट आणि वेब सीरिज यांची एक छोटीशी झलक दाखवली असून अभिनेता फरहान अख्तरने याचे पोस्टर देखील शेअर केले आहे

एंटरटेनमेंट डेस्क : मिर्झापूर या वेब सिरीज आणि त्यातील कलाकारांनी साकारलेल्या व्यक्ती रेखा प्रेक्षकांच्या पसंतीला पडल्या आहेत. गुन्हेगारी विश्वावर तयार करण्यात आलेल्या या सीरिजचे दोन भाग खूप जास्त लोकप्रिय ठरले. आता प्रेक्षकांना प्रतीक्षा होती ती तिसऱ्या सीझनची . मागील सीझनमध्ये चाहत्यांना कथेच्या मध्यभागी सोडून एक सस्पेन्स क्रिएट करण्यात आला असल्याने या सीरिजच्या तिसऱ्या सीझनसाठी प्रेक्षक फार उत्सुक असल्याचं दिसत होत आता ती प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

या सीझनमध्ये कालीन भैय्या हे त्यांच्या मुलाच्या खुनाचा बदला घेणार आहेत का? की गुड्डू भैय्या हाच ‘मिर्झापूर’चा राजा होणार? याविषयीच्या सध्या प्रेक्षकांमध्ये रंगल्या आहेत. प्रेक्षक या तिसऱ्या सीझनच्या घोषणेची आतुरतेने वाट बघत होते. अशातच आता प्राइम व्हिडीओने याबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.

View post on Instagram
 

नुकतंच प्राइम व्हिडीओने एक खास व्हिडीओ शेअर करत 2024 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या तब्बल 70 वेगवेगळे चित्रपट आणि वेब सीरिज यांची एक छोटीशी झलक दाखवली. याच व्हिडीओमध्ये ‘मिर्झापूर’च्या तिसऱ्या सीझनचीही झलक लोकांना पाहायला मिळाली. “भूल तो नहीं गये हमें” असा प्रश्न विचारत पंकज त्रिपाठी हे कालीन भैय्या यांच्या भूमिकेत पाहायला मिळाले. तर सीरिजमधील इतरही महत्त्वाच्या पात्रांची एक झलक यात पाहायला मिळाली. अली फजल, श्वेता त्रिपाठी, रासिका दुग्गल, विजय वर्मा, ईशा तलवार यांच्या पात्रांची झलकही या व्हिडीओत काही सेकंदासाठी बघायला मिळाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आता केव्हा नवीन सिझन पाहता येईल अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.

आणखी वाचा :

टायगर श्रॉफने खरेदी केले नवे घर, प्रत्येक महिन्याचे भाडे ऐकून व्हाल अव्वाक

Alibaba ani Chalishitale Chor : आंबट-गोड थोडीशी तिखट, चाळीशीतली मस्ती "गॉसिप" या मराठी चित्रपटाचे भन्नाट ट्रेलर

झी मराठी वाहिनीवर 10 वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या मालिकेने घेतला निरोप...