सार

मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट जुलैमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. त्याआधी १ ते ३ मार्च तीन दिवसीय विवाहपूर्व कार्यक्रमाचे आयोजन जामनगर येथे करण्यात आले होते.यामध्ये शाहरुख,अमीर आणि सलमान खानने एकत्र डान्स केला.

जामनगर : मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या वर्षी जुलैमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. त्याआधी १ ते ३ मार्च या कालावधीत गुजरातमधील जामनगर येथे तीन दिवसीय विवाहपूर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम बॉलीवूडच्या तारकांसह देश-विदेशातील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीने गजाला. या पार्टीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर देखील करण्यात आले. नुकताच या कार्यक्रमाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये बॉलिवूडचे तिनही खान एकत्र दिसत आहेत.

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग इव्हेंटच्या या नवीन व्हिडिओमध्ये शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान परफॉर्म करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये शाहरुख आणि सलमान खोटे भांडताना दिसत असून दुसरीकडे आमिर दोघांना शांत करताना दिसत आहे. किंग खान व्हिडिओमध्ये म्हणत आहे की ते तिघेही एकत्र परफॉर्म करतील, कारण मुकेश अंबानी यांना तिघांनाही एकत्र नाचताना पाहण्याची इच्छा असून राधिका आणि अनंतसाठी ही खास भेट असेल. यानंतर सलमान 'दबंग'चे गाणे वाजवण्यास सांगतो. त्याचवेळी शाहरुख त्याचे गाणे वाजवण्यास सांगतो.

व्हिडिओमध्ये सलमान आणि शाहरुख आपापल्या गाण्यावर भांडताना दिसत आहेत. दोघांना भांडताना पाहून आमिरने दोघांनाही शांत व्हायला सांगितले. त्यांनी दोघांना पुन्हा भांडण न करण्यास सांगितले जात. तसेच त्या दोघांच्या जागी त्याचे गाणे वाजवण्यासाठीचा हट्ट अमीर करत असतो तेवढ्यातच मुकेश आणि नीता अंबानी यांनी निवडलेल्या गाण्यावर डान्स करायचे ठरवतात.

आमिर, सलमान आणि शाहरुख अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगमध्ये एसएस राजामौली यांच्या 'RRR' मधील "नाटू-नाटू" गाण्यावर नृत्य करतात.या दरम्यान नीता अंबानी म्हणतात की राम चरण देखील इथे हजर आहे. हे ऐकताच किंग खान राम चरणला स्टेजवर येण्याची विनंती करतो.तीनही खानचा डान्स चाहत्यांना खूप आवडला असून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. .

राधिका अनंत प्री वेडिंग इव्हेंटमध्ये याही कलाकारांचा सहभाग -

राधिका-अनंतच्या प्री-वेडिंग इव्हेंटमध्ये बॉलिवूडचे अनेक स्टार्स दिसले. यामध्ये अमिताभ बच्चन, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, सैफ अली खान, सारा अली खान, करीना कपूर खान, राणी मुखर्जी, अनिल कपूर, वरुण धवन, इब्राहिम अली खान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट, अनन्या पांडे आणि आदित्य रॉय यांच्यासह अनेक स्टार्सचा समावेश आहे. कपूर यांचा समावेश होता.