प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवने पार्टीसाठी सापाचे विष पुरवत असल्याची दिली कबुली, सूत्रांची माहिती

| Published : Mar 18 2024, 11:42 AM IST / Updated: Mar 18 2024, 12:21 PM IST

Youtuber Elvish Yadav
प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवने पार्टीसाठी सापाचे विष पुरवत असल्याची दिली कबुली, सूत्रांची माहिती
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव याच्यावर रेव्ह पार्ट्यांमध्ये दुर्मिळ सापांसह त्यांचे विष पुरवण्याचा आरोप होता. अशातच एल्विशने आपला गुन्हा मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Elvish Yadav Arrested :  सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म युट्यूबवरील (YouTube) युट्यूबर एल्विश यादव याला नोएडा (Noida) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सापांचे विष (Snake Venom) खरेदी-विक्रीच्या प्रकरणात एल्विशला अटक केली आहे. पोलिसांनी एल्विशची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे. एल्विशने म्हटले की, पार्टीमध्ये सहभागी झालेल्या आरोपींना ओखळतो आणि त्यांची भेटही झाली होती. एल्विशवर असा आरोप आहे की, तो पार्ट्यांमध्ये साप आणि सापांचे विष पुरवायचा.

एल्विशने मान्य केला गुन्हा
एल्विश यादवने मान्य केले आहे की, नोव्हेंबर (2023) मध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींसोबत तो संपर्कात होता. नोएडा पोलिसांनी एल्विशला रविवारी (17 मार्च) अटक केली आहे. काही महिन्यांआधी एल्विशला एका रेव्ह पार्टीत पाहिले गेले. तेथे एल्विश आपल्या मित्रांसोबत कथित रुपात दुर्मिळ साप गळ्यात टाकत पार्टी करत होता.

शिक्षा झाल्यास जामिन मिळणे कठीण
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले. नोएडा पोलिसांनी एल्विश यादवच्या विरोधात एनडीपीएस कायद्यातील (NDPS Act) कलम 29 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या काद्याअंतर्गत अशावेळी कार्यवाही केली जाते, ज्यावेळी एखादा व्यक्ती अंमली पदार्थाच्या प्रकरणात सहभागी असेल अथवा प्रकरण अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्री संदर्भातील असेल. खरंतर, अशा प्रकरणांमध्ये शिक्षा मिळालेल्या व्यक्तीला जामिन मिळणे कठीण असते.

नोएडातील पार्टीमध्ये पुरवले होते सापाचे विष
एल्विश यादवला सध्या 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या वर्षात 3 नोव्हेंबरला एल्विशने नोएडातील सेक्टर 51 येथील एका बँक्वेट हॉलमध्ये सापाचे विष पुरवले होते. फॉरेंसिक टीमने याची पुष्टी देखील केली होती. त्यावेळी एल्विश यादवसह अन्य सहा जणांवर वाइल्डलाइफ प्रोटेक्शन अ‍ॅक्ट (Wildlife Protection Act) आणि आयपीसी (IPC) कलम 129(ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. एल्विशची याआधी देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात आल्यानंतरही अटक झाली नव्हती.

आणखी वाचा : 

बीग बाॅस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादवला साप विष प्रकरणी नोएडा पोलिसांनी केली अटक....

Amitabh Bachchan Health News Fake : अमिताभ बच्चन एकदम ठणठणीत, प्रकृती बिघडल्याच्या बातम्या खोट्या

अश्लील कंटेटच्या या 18 OTT प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने घातली बंदी