लॉरेन्स बिष्णोई टोळीचा हत्येमध्ये हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या टोळीने अजून हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.
काल रात्री बाबा सिद्धीकी यांची हत्या करण्यात आली. त्यामुळं राज्यात सुरक्षेची मोठ्या प्रमाणावर चिंता वाढली आहे.
बाबा सिद्धीकी यांच्यावर यावेळी सहा गोळ्या झाडण्यात आल्या. चार गोळ्या त्यांच्या छातीत लागल्यामुळं त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्या.
पोलिसांनी यासाठी चार पथके तैनात करण्यात आली आहेत. लवकरच गुन्हेगार शोधण्यासाठी मुंबई पोलिसांना प्रयत्न करावा लागणार आहे.
दसऱ्याच्या सणासोबतच हे शूटिंग तीन जणांनी केले होते. गुरमेल बलजीत सिंग (23), हरियाणाचा आणि धर्मराज कश्यप (19, उत्तर प्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली, तर तिसरा फरार आहे.
बाबा सिद्धीकी याना १५ दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
सलमान खानचा मित्र तो आमचा शत्रू असं रोहित गोदाराने दावा केला होता. बिष्णोई गँगमध्ये ७०० पेक्षा जास्त शुटर असून ते त्याच्यासाठी काम करत आहेत.