सार

22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. पण अमेरिकेतही रामललांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी खास तयारी केली जात आहे.

Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी केली जात आहे. संपूर्ण देशभरात उत्साहाचा आनंद आहे. अशातच भारतासह अमेरिकेतही (USA) राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचा आनंद पाहायला मिळत आहे. 

अमेरिकेतील 10 राज्यांमधील विश्व हिंदू परिषदेने श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासंदर्भातील 40 मोठे बिलबोर्ड्स लावले आहेत. याशिवाय 22 जानेवारीला अमेरिकेत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

विश्व हिंदू परिषदेकडून लावण्यात आलेत बिलबोर्ड्स
अमेरिकेत राहणाऱ्या हिंदू आणि विश्व हिंदू परिषद युएस चॅप्टरकडून (Vishwa Hindu Parishad of America) 40 मोठे बिलबोर्ड्स लावण्यात आले आहेत. या बिलबोर्ड्सवर 22 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यात आली आहे. हे बिलबोर्ड्स टेक्सास, इलिनॉय (Illinois), न्युयॉर्क, न्यु जर्सी, जॉर्जियासह सर्व राज्यांमध्ये लावण्यात आले आहेत.

विश्व हिंदू परिषद युएस चॅप्टर यांच्यानुसार, अ‍ॅरिझोना आणि मिसूरीमध्ये (Missouri) 15 जानेवारीपासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. बिलबोर्ड्सच्या माध्यमातून सांगितले जातेय की, हिंदू अमेरिकन कम्युनिटी यावेळी सहभागी होतील.

अमेरिकेत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन
अमेरिकेत राहणाऱ्या हिंदू अमेरिकन कम्युनिटीकडून राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी काही कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये कार रॅली काढण्यासह कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण करण्याची तयारी केली जात आहे. याशिवाय अमेरिकेतील टाइम्स स्क्वायरवर (Times Square) राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे.

आणखी वाचा : 

Ayodhya Ram Mandir : परदेशातही होणार राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा जल्लोष, अमेरिकेत काढली जाणार कार रॅली

22 जानेवारीला अयोध्येत जाण्याचा विचार करताय? आधी हे वाचा

राम मंदिराचे बांधकाम करतेय ही कंपनी, अशी आहे Success Story