राम मंदिराचे बांधकाम करतेय ही कंपनी, अशी आहे Success Story
अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम लार्सन अॅण्ड टुब्रो (L&T) कंपनीकडून केले जातेय. राम मंदिराच्या बांधकामामुळे कंपनीची एक वेगळीच ओखळ निर्माण झाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘एल अॅण्ड टी’ ने राम मंदिराचे ऐवढे मजबूत काम केलेय की, पुढील एक हजार वर्षे तरी मंदिराला कोणतेही नुकसान होणार नाही.
राम मंदिराची उभारण्याआधी एल अॅण्ड टीने जगातील सर्वाधिक उंच मूर्ती म्हणजेच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आणि दिल्लीतील ‘लोटस टेम्पल’ चे बांधकाम केलेय.
L&T भारतीय कंपनी आहे. डेन्मार्क येथून भारतात आलेल्या दोन इंजिनिअर्स-हेनिंग होलोक लार्सन व सोरेन क्रिश्चियन टुब्रो यांनी कंपनीची स्थापना केली होती.
80 वर्षांपासून L&T भारतात काम करत आहे. याशिवाय 30 पेक्षा अधिक देशांमध्ये या कंपनीचा व्यवसाय विस्तारला गेलाय. कंपनी इंजिनिअरिंग, बांधकाम, आर्थिक सुविधा व IT क्षेत्रात काम करते.
हेनिंग होलोक लार्सन व सोरोन क्रिश्चियन टुब्रो हे दुसऱ्या महायुद्धाआधी कोपोनहेगनच्या FL स्मिथ अॅण्ड कंपनीचे कर्मचारी होते. वर्ष 1937 च्या आसपास लार्सन भारतात आले होते.
लॉर्सन आपला जुना मित्र टुब्रो यांना भेटले, जे आधीपासूनच भारतात होते. ज्यावेळी दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर लार्सन-टुब्रो मुंबईतच राहिले आणि L&Tची स्थापना केली.