22 जानेवारीला अयोध्येत जाण्याचा विचार करताय? आधी हे वाचा
India Jan 12 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
रामललांची प्राणप्रतिष्ठा
येत्या 22 जानेवारीला रामललांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या दिवशी अयोध्येत व्हीव्हीआयपी उपस्थितीत राहणार आहेत. यामुळे भाविकांना घरातूनच रामललांचे दर्शन करण्यास सांगितलेय.
Image credits: Our own
Marathi
भाविकांसाठी रामललांचे दर्शन कधी?
भाविकांना रामललांचे दर्शन 23 जानेवारीपासून करता येणार आहे. अयोध्येत येणाऱ्या भाविकांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतरच मंदिरात प्रवेश मिळणार आहे.
Image credits: social media
Marathi
अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन सोहळा
राम मंदिराचा उद्घाटन सोहळा असल्याने व्हीव्हीआयपींसह मोठ्या संख्येने साधू-संत अयोध्येत येणार आहेत. यामुळे अयोध्येत सामान्य भाविकांना रामललांचे दर्शन घेणे शक्य होणार नाहीय.
Image credits: social media
Marathi
22 जानेवारीला अयोध्येत असणार तुफान गर्दी
राम मंदिराचा उद्घाटन सोहळा असल्याने 22 जानेवारीला अयोध्येत तुफान गर्दी असणार आहे. यावेळी तुम्हाला राहण्यासाठी हॉटेलचे बुकिंगही मिळणार नाही.
Image credits: asianet news
Marathi
अत्यावश्यक वस्तू न मिळण्याची शक्यता
परिवारासोबत अयोध्येत 22 जानेवारीला जाण्याचा प्लॅन करताय तर तो रद्द करू शकता. या दिवशी तुम्हाला अयोध्येत खूप गर्दी भेटेल. पण अत्यावश्यक वस्तू देखील न मिळण्याची शक्यता आहे.
Image credits: Our own
Marathi
अयोध्येत कसे पोहोचायचे?
अयोध्येत पोहोचण्यासाठी तुम्ही ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करू शकता. याशिवाय महर्षी वाल्मिकी विमानतळावरूनही तुम्हाला अयोध्येत येता येईल.