न्युयॉर्कमधील Times Squareवर राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण दाखवणार, अशी करण्यात आलीय खास तयारी

| Published : Jan 08 2024, 11:22 AM IST / Updated: Jan 12 2024, 01:23 PM IST

times square

सार

Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. या सोहळ्यासह भारतातच नव्हे तर विदेशातील रामललांचे भक्त उत्साहित आहेत. देभरात राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा लाइव्ह दाखवला जाणार आहे.

Ram Mandir Ceremony : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचा जगभरात उत्साह पाहायला मिळत आहे. रिपोर्ट्सनुसार, न्युयॉर्कमधील (New York) प्रसिद्ध टाइम्स स्क्वायरवरही (Times Square) राम मंदिराच्या सोहळ्याचे लाइव्ह दाखवले जाणार आहे. याशिवाय भारतीय दूतवासाच्या येथे देखील लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे.

दिल्लीत अशी केलीय तयारी
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळ्याला ऐतिहासिक रूप देण्यासाठी देशात विविध ठिकाणी लाइव्ह प्रक्षेपणाची तयारी केली जात आहे. दिल्लीतच 14 हजार मंदिरांमध्ये राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. 

भाजपाच्या टेम्पल सेलचे चेअरमन करनॅल सिंह यांनी ही माहिती दिली आहे. सिंह यांनी म्हटले की, "प्रत्येक मंदिरात कमीत कमी 200 नागरिक उपस्थितीत असतील. आम्हाला अपेक्षा आहे की, दिल्लीतूनच जवळजवळ 30 लाख नागरिक राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे साक्षीदार होतील."

1 लाखांहून अधिक दिवे लावणार 
लाइव्ह प्रक्षेपणासह 1 लाख 8 हजार दिवे लावले जाणार असल्याची माहिती भाजपा नेत्याने दिली आहे. दिल्ली-करनाल रोडवर असलेल्या खाटू श्याम मंदिरापासून 20 जानेवारीला बाइल रॅली काढली जाणार आहे. याशिवाय दिल्लीत राम मंदिराच्या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाच्या जागरूकतेसाठी 1 हजार युनिपोल्सवर (Unipole) बॅनर लावले जाणार आहेत.

कारागृहातील कैद्यांसाठी खास व्यवस्था
उत्तर प्रदेशातील तुरुंग मंत्री धर्मवीर प्रजापति यांनी म्हटले की, कारागृहातील कैद्यांना देखील राम मंदिराच्या सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. कारागृहातील कैदीही या सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. कारागृहात 1 लाखांहून अधिक कैदी असून ते सुद्धा भारताचे नागरिक आहेत. यामुळेच आम्ही त्यांच्यासाठी लाइव्ह प्रक्षेपणाची व्यवस्था करत आहोत हे देखील प्रजापति यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : 

Ram Mandir Ceremony : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा देशभरातील नागरिकांना पाहाता येणार? BJPकडून केली जातेय खास तयारी

Ram Mandir Ceremony : राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी तैनात पोलिसांना स्मार्टफोन वापरण्यावर बंदी, या कारणास्तव घेतलाय निर्णय

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी VVIPना पाठवली जातेय खास निमंत्रण पत्रिका, जाणून घ्या खासियत

Read more Articles on