सार

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्साह आता भाविकांमध्ये शिगेला पोहोचला आहे. अयोध्येत सर्वत्र उत्साह-आनंदाचे वातावरण आहे. राम मंदिराच्या सोहळ्यादिवशी भारतातच नव्हे तर परदेशातही जल्लोष करण्याची तयारी केली जात आहे.

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. सोहळ्यासाठी जय्यत तयारी जोरदार सुरू आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचा उत्साह भारतासह आता परदेशातील भाविकांमध्येही दिसून येत आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

अमेरिकेत राहणारे भारताचे नागरिक राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा जल्लोष करण्याची तयारी करत आहेत. सोहळ्यावेळी अमेरिकेत भारतीय नागरिक रॅली काढण्याचा विचार करत आहेत.

अमेरिकेत राम मंदिराचा जल्लोष
‘कॅलिफोर्निया इंडियन्स’ ग्रुप येत्या 20 जानेवारीला श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त जल्लोष साजरा करणार आहेत. यावेळी खास कार रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. आयोजकांचे म्हणणे आहे की, रॅलीमध्ये 400 पेक्षा अधिक कार चालक सहभागी होणार आहेत. याशिवाय साउथ बे (South Bay) ते प्रतिष्ठित गोल्डन ब्रिजपर्यंत (Golden bridge) रॅली काढली जाणार आहे.

22 जानेवारीपर्यंत अमेरिकेत उत्सव
आयोजनकांनी पुढे सांगितले की, उत्तर कॅलिफोर्नियातील (California)भारतीय नागरिक राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा जोरदार जल्लोष करणार आहेत. संपूर्ण अमेरिकेतील स्थानिक मंदिर आणि प्रवासी संघटना 22 जानेवारीपर्यंत खास सेलिब्रेशन करणार आहेत.

अमेरिकेतील या शहरात काढली जाणार रॅली
वॉशिंग्टन (Washington), शिकागो (Chicago) आणि अमेरिकेतील अन्य शहरांमध्ये राम मंदिराच्या सोहळ्याचा जल्लोष कार रॅली काढून केला जाणार आहे. अयोध्येत जाऊ शकत नाही पण प्रभू राम प्रत्येकाच्या हृदयात असल्याचेही आयोजकांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : 

शेफ मनोहर राम मंदिरासाठी तयार करणार सात हजार किलोंचा 'Ram Halwa'

Ram Mandir Ceremony : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा देशभरातील नागरिकांना पाहाता येणार? BJPकडून केली जातेय खास तयारी

राम मंदिराला सोन्याचे दरवाजे? जाणून घ्या मंदिराबद्दलचे Unknown Facts