VIDEO : अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला, पत्नीने परराष्ट्र मंत्र्यांना मदतीसाठी लिहिले पत्र

| Published : Feb 07 2024, 09:39 AM IST / Updated: Feb 07 2024, 09:46 AM IST

Indian Student Attacked In US

सार

अमेरिकेतील शिकागो येथे एका भारतीय विद्यार्थ्यावर चार जणांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्लेखोरांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत त्याचा फोनही चोरला आहे. घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

Indian Student Attack, Robbed in US :  अमेरिकेत एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. हल्लेखोरांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत त्याचा फोनही चोरला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पीडित विद्यार्थ्याचे नाव सैयद मजाहिर अली आहे. अमेरिकेतील शिकागो येथे सैयद याच्यावर हल्ला झाला असून त्याचा परिवार हैदराबाद येथे राहतो. सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दिसतेय की, हल्लेखोरांपासून आपला जीव वाचवण्यासाठी सैयद रस्त्यावरुन धावतोय. याशिवाय सैयद रक्तबंबाळ झाल्याचेही व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

सैयदच्या पत्नीने परराष्ट्र मंत्र्यांना लिहिले पत्र
सैयद मजाहिर अली याची पत्नी सैयदा रुकुलिया फातिमा रिझवीने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) यांना पतीवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पत्र लिहून मदत मागितली आहे. याशिवाय परराष्ट्र मंत्रालयाने हे पाहावे की, पतीवर व्यवस्थितीत उपचार होतायत की नाही. याशिवाय माझ्या पतीच्या सुरक्षिततेसंदर्भात अधिक चिंतेत असल्याचेही रकुलिया फातिमा हिने पत्रात म्हटले आहे. तुम्हाला विनंती करते की, पतीला उत्तम उपचार मिळण्यासाठी मदत करावी.

सैयद अमेरिकेतील इंडियाना वेस्लेयन विद्यापीठात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येतेय की, तीन हल्लेखोर सैयदचा पाठलाग करत आहेत. हल्ल्यानंतर अली म्हणतो की, "मी घरत परत येत असताना चार लोकांनी माझ्यावर हल्ला केला. मला बेदम मारहाण केली. कृपया माझी मदत करावी."

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले होण्याचे सत्र सुरूच
दरम्यान, गेल्या काही काळापासून अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वर्ष 2024 मध्ये अमेरिकेत चार भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा : 

किंग चार्ल्स III यांना कर्करोगाचे निदान झाल्याची बॅकिंघम पॅलेसची माहिती, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रकृती सुधारण्यासाठी केली प्रार्थना

Israel-India : 71 टक्के इस्राइली नागरिकांनी भारताबद्दल व्यक्त केले हे मत, चीन-पाकिस्तानवर विश्वास नसल्याची दिली प्रतिक्रिया

US-UK चा येमेनमधील हुथींच्या 36 स्थानांवर हल्ला, लाल समुद्रातील 3 जहाजांवर केली कारवाई