Israel-India : 71 टक्के इस्राइली नागरिकांनी भारताबद्दल व्यक्त केले हे मत, चीन-पाकिस्तानवर विश्वास नसल्याची दिली प्रतिक्रिया

| Published : Feb 05 2024, 11:30 AM IST / Updated: Feb 05 2024, 11:58 AM IST

ISRAEL INDIA
Israel-India : 71 टक्के इस्राइली नागरिकांनी भारताबद्दल व्यक्त केले हे मत, चीन-पाकिस्तानवर विश्वास नसल्याची दिली प्रतिक्रिया
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्स यांच्याकडून नुकतीच एक यादी जारी करण्यात आली आहे. या यादीमध्ये इज्राइल देशाने भारताबद्दल काय मत व्यक्त केलेय याबद्दल सांगण्यात आले आहे.

Israel-India : नुकत्याच काही दिवसांपूर्वी वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्स (World Of Statistics) यांनी एक यादी जारी केली आहे. या यादीमध्ये इज्राइल देशाने भारताला सर्वाधिक उत्तम देश असल्याचे मानले आहे. यावर इस्राइलकडून प्रतिक्रिया देखील देण्यात आली आहे. इस्राइल देशाच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' अधिकृत अकाउंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

या पोस्टमध्ये लिहिण्यात आलेय की, आम्हाला भारतीय मित्रांवर फार प्रेम आहे. प्यू रिसर्च सेंटरनुसार (Pew Research Center), इज्राइलने भारताबद्दचे मत व्यक्त केले आहे. इज्राइली नागरिकांनी भारताला 71 टक्के पसंती दिली आहे. यानंतर युनायटेड किंग्डम (66 टक्के), केनिया (64 टक्के), नायजेरिया (60 टक्के), दक्षिण कोरिया (58 टक्के), जपान (55 टक्के), ऑस्ट्रेलिया (52 टक्के) आणि इटलीमधील 52 टक्के नागरिकांनी भारताला पसंती दर्शवली आहे.

इस्राइलची 'X'प्लॅटफॉर्मवरील पोस्ट
जगातील काही देशांपैकी बहुतांश देशांनी भारताबद्दलचे आपले मत व्यक्त केले आहे. यामध्ये इस्राइजल देश सर्वाधिक उच्च स्तरावर असून तेथील 71 टक्के नागरिकांनी भारताला पसंती दर्शवली आहे. इस्राइलनंतर युनाटडेट किंग्डमचा क्रमांक लागतो, जो भारताबद्दल सकारात्मक दृष्टीकोन ठेवतो.

दरम्यान, भारताचे जागतिक स्तरावर अन्य देशांसोबतचे नातेसंबंधं अधिक घट्ट आहेत. याचे पुरावे नुकत्याच काही घटनांमध्ये दिसून आले. जसे की, सर्व देशांनी म्हटले होते भारतच रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) आणि इज्राइल-हमासमधील (Israel–Hamas) युद्धाला विराम देऊ शकतो.

चीन-पाकिस्तानवर विश्वासच नाही
इज्राइलने जारी केलेल्या यादीमध्ये भारताच्या शेजारील देश पाकिस्तान (Pakistan) आणि चीननचे (China) नावच नाही. खरंतर भारताचे पाकिस्तान आणि चीनसोबतचे नातेसंबंध उत्तम नाहीत. दोन्ही देशांसोबत भारताचे सीमावाद होत राहतात, जी एक मोठी समस्या आहे.

आणखी वाचा : 

US-UK चा येमेनमधील हुथींच्या 36 स्थानांवर हल्ला, लाल समुद्रातील 3 जहाजांवर केली कारवाई

UPI Goes Global : फ्रान्समध्ये यूपीआय प्रणाली लाँच, भारतीय प्रवाशांना पेमेंट करणे होणार सोपे

इराक-सीरियातील इराण समर्थित गटांवर अमेरिकेचा एअरस्ट्राईक, 18 ठार