US : अमेरिकेत मृताव्यस्थेत सापडला भारतीय विद्यार्थी श्रेयस रेड्डी, यंदाच्या वर्षातील चौथी घटना

| Published : Feb 02 2024, 10:38 AM IST / Updated: Feb 02 2024, 10:43 AM IST

Crime News

सार

अमेरिकेत आणखी एक भारतीय विद्यार्थी मृताव्यस्थेत सापडला आहे. मृत विद्यार्थ्याची ओळख श्रेयस रेड्डी बेनिगर असल्याचे सांगितले जात आहे. श्रेयस ओहायोच्या लिंडर स्कूल ऑफ बिझनेस येथे शिक्षण घेत होता.

Crime News :  अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. श्रेयस रेड्डी बेनिगर असे विद्यार्थ्याचे नाव आहे. श्रेयस अमेरिकेतील ओहायोच्या लिंडर कॉलेज ऑफ बिझनेस विद्यापीठात (Lindner College of Business University) शिक्षण घेत होता. भारतीय विद्यार्थ्यांचा अमेरिकेत मृत्यू झाल्याची ही चौथी घटना आहे.

न्यूयॉर्कमधील (New York) भारताच्या वाणिज्य दूतवासाने या घटनेवर दु:ख व्यक्त करत म्हटले की, बेनिगर याच्या मृत्यूबद्दल अधिक तपास केला जात आहे. वाणिज्य दूतवासाने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "ओहायोमधील भारतीय विद्यार्थी श्रेयस रेड्डी बेनिगर याच्या मृत्यूबद्दल आम्ही दु:ख व्यक्त करतो. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. दूतवास बेनिगर परिवारासोबत संपर्कात आहे. परिवाराला शक्य होईल तेवढे सहकार्य आणि मदत करू."

नील आचार्यचा मृत्यू झाला होता मृत्यू
पर्ड्यू विद्यापीठात (Purdue University) शिकणाऱ्या नील आचार्य नावाच्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू याच आठवड्यात झाला होता. नील रविवारपासून (21 जानेवारी) बेपत्ता होता. बेपत्ता झाल्याच्या काही तासांनंतर नीलचा मृतदेह विद्यापीठाच्या परिसारात आढळला होता.

दुसऱ्या घटनेत, 16 जानेवारीला अमेरिकेतील जॉर्जियात एका बेघर व्यक्तीने भारतीय विद्यार्थी विवेक सैनी याच्या डोक्यात हातोड्याने वार करत त्याची हत्या केली होती. विवेक सैनी मूळचा हरियाणातील पंचकुला येथे राहणारा होता.

भारतीय विद्यार्थी अकुल धवन याचा मृत्यू
भारतीय विद्यार्थी अकुल इलिनॉय विद्यापीठात (Illinois University) इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी आला होता. अकुलचाही मृतदेह विद्यापाठीच्या परिसरात सापडल्याची घटना घडली होती. अकुलच्या मृत्यूनंतर शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये असे समोर आले होते की, त्याचा मृत्यू हायपोथर्मिया (Hypothermia) आजारामुळे झाला होता. पण अकुलच्या नातेवाईकांनी विद्यापीठाच्या प्रशासनासह स्थानिक पोलिसांच्या विरोधात तक्रार दाखल केली होता. याशिवाय अकुल बेपत्ता झाल्यानंतरही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोपही त्याच्या नातेवाईकांनी लावला होता.

आणखी वाचा : 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे डीपफेक फोटो-व्हिडीओ व्हायरल, White Houseने दिली अशी प्रतिक्रिया

Shocking! हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या नादात आरोपीकडून लागली संपूर्ण इमारतीला आग, 76 जणांचा मृत्यू

तुम्ही मुलांना कारच्या खिडकीजवळ बसवता का? नक्की पाहा अंगावर काटा आणणरा VIDEO