किंग चार्ल्स III यांना कर्करोगाचे निदान झाल्याची बॅकिंघम पॅलेसची माहिती, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रकृती सुधारण्यासाठी केली प्रार्थना

| Published : Feb 06 2024, 12:03 PM IST / Updated: Feb 06 2024, 12:13 PM IST

Modi king charles
किंग चार्ल्स III यांना कर्करोगाचे निदान झाल्याची बॅकिंघम पॅलेसची माहिती, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रकृती सुधारण्यासाठी केली प्रार्थना
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

किंग चार्ल्स तृतीय यांना कर्करोग निदान झाल्याची माहिती बॅकिंघम पॅलेसने दिली आहे. या संदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर दिली आहे.

King Charles III Diagnosed with Cancer : किंग्स चार्ल्स तृतीय यांना कर्करोग निदान झाल्याची माहिती बॅकिंघम पॅलेसने (Bankimgham Palace) दिली आहे. या संदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 75 वर्षीय किंग्स चार्ल्स तृतीय यांना कर्करोगाचे निदान झाले आहे. पण कर्करोग आणि प्रोस्टेट ग्रंथींशी संबंधित नाही. किंग चार्ल्स तृतीय यांना नेमका कोणता कर्करोग झालाय याची माहिती देण्यात आलेली नाही. बॅकिंघम पॅलेसने सोमवारी (5 फेब्रुवारी) म्हटले की, किंग्स चार्ल्स तृतीय यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

बॅकिंघम पॅलेसने म्हटले की, किंग्स चार्ल्स तृतीय यांची प्रकृती उत्तम आहे. लवकरच राजकीय कामकाज किंग्स चार्ल्स तृतीय सुरू करतील. किंग्स चार्ल्स तृतीय यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले नाही. सध्या किंग्स चार्ल्स तृतीय यांच्यावर आऊटडोर रुग्ण म्हणून उपचार सुरू करण्यात आले आहेत.

सार्वजनिक कार्यक्रम रद्द
बॅकिंघम पॅलेसने दिलेल्या माहितीनुसार, किंग्स चार्ल्स तृतीय आपले सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करणार आहेत. अशी अपेक्षा आहे की, राजघराण्यातील अन्य सदस्य त्यांचे मनोबल वाढवण्यास मदत करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत म्हटले की, किंग्स चार्ल्स तृतीय यांची प्रकृती सुधारण्यासाठी भारतवासियांसोबत प्रार्थना करतो.

ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे ट्विट
ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषी सुनक (UK PM Rishi Sunak) यांनी किंग्स चार्ल्स तृतीय यांच्या संदर्भातील एक ट्विट केले आहे. ट्विट करत ऋषी सुनक यांनी किंग्स चार्ल्स यांची प्रकृती लवकर सुधारण्यासाठी प्रार्थना केली आहे.

विरोधी कामगार पक्षाने केले ट्विट
विरोधी कामगार पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनी म्हटले की, कामगार पक्ष किंग्स चार्ल्स तृतीय यांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करतो.

दरम्यान, वर्ष 2022 रोजी महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर किंग्स चार्ल्स यांना वयाच्या 74 व्या वर्षी ब्रिटेनच्या सिंहासनावर आरूढ झाले होते.

आणखी वाचा : 

Israel-India : 71 टक्के इस्राइली नागरिकांनी भारताबद्दल व्यक्त केले हे मत, चीन-पाकिस्तानवर विश्वास नसल्याची दिली प्रतिक्रिया

US-UK चा येमेनमधील हुथींच्या 36 स्थानांवर हल्ला, लाल समुद्रातील 3 जहाजांवर केली कारवाई

इराक-सीरियातील इराण समर्थित गटांवर अमेरिकेचा एअरस्ट्राईक, 18 ठार