Ram Mandir Ceremony : दादर येथील शिवाजी पार्कात उभारलीय राम मंदिराची सुंदर प्रतिकृती, पाहा VIDEO

| Published : Jan 18 2024, 10:30 AM IST / Updated: Jan 18 2024, 12:22 PM IST

Ayodhya Ram Mandir

सार

अयोध्येत येत्या 22 जानेवारीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. अशातच मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कात राम मंदिराची सुंदर प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

Ayodhya Ram Mandir Ceremony : अयोध्येतील राम मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे. येत्या 22 जानेवारीला मुख्य प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. देभरात विविध ठिकाणी प्राणप्रतिष्ठेनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. अशातच दादरमधील (Dadar) शिवाजी पार्कात (Shivaji Park) राम मंदिराची सुंदर प्रतिकृती साकारण्यात आली आहे. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शिवाजी पार्कात राम मंदिराची प्रतिकृती साकारात त्याला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेस ही प्रतिकृती पाहण्यासाठी सध्या नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. याशिवाय प्रभू रामांची ही प्रतिकृती 45 फूट उंचीची बनवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

VIDEO :  शिवाजी पार्क येथे साकारलीय राम मंदिराची आकर्षक प्रतिकृती, पाहा व्हिडीओ 

View post on Instagram
 
View post on Instagram
 
View post on Instagram
 

नागर शैलीत उभारण्यात आलेय राम मंदिर
राम मंदिर हे पारंपरिक नागर शैलीत (Nagara Style) बांधण्यात आले आहे. भाविकांना सिंह दरवाज्यातून मंदिरात प्रवेश करता येणार आहे. मंदिर 161 फूट उंचीचे असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मंदिरामध्ये 329 स्तंभ आणि 44 दरवाजे आहेत. याशिवाय मंदिरातील स्तंभांवर देवी-देवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. मंदिरात येणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सेवा उपलब्ध असणार आहे.

आणखी वाचा : 

Ram Mandir Ceremony : रामललांसाठी 12 लाखांहून अधिक भक्तांनी हातमागावर विणकाम करुन तयार केले रेशमी वस्र

57 वर्षांपूर्वी राम मंदिराबद्दल करण्यात आली होती भविष्यवाणी, सोशल मीडियावर पोस्टाचे तिकीट व्हायरल

घरबसल्या राम मंदिरातील आरतीसाठी लावता येईल उपस्थिती, ऑनलाइन पास मिळवण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो

Read more Articles on