महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत गाडीवर दिसलेल्या लाल-निळ्या दिव्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. 2017 मध्ये केंद्र सरकारने सामान्य सरकारी वाहनांवर अशा दिव्यांवर बंदी घातली होती. मात्र महापौरांच्या गाडीवर असे दिवे दिसल्याने विरोधकांनी सरकारवर व्हीआयपी संस्कृती पुन्हा आणल्याचा आरोप केला आहे.

मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौरांच्या अधिकृत वाहनावर दिसलेल्या लाल आणि निळ्या दिव्यांमुळे सध्या राजकीय आणि सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. रितू तावडे यांच्या नव्या अधिकृत गाडीवर फ्रंट ग्रिलजवळ फ्लॅशिंग दिवे बसवलेले दिसत आहेत. केंद्र सरकारने 2017 मध्ये अशा दिव्यांवर बंदी घातली असतानाही हे दिवे वापरल्याचा आरोप होत आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

विरोधकांचा सवाल

ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये महापौरांच्या गाडीवरील दिव्यांचा उल्लेख करत “नवनिर्वाचित महापौरांच्या गाडीवर नेमकं काय चाललंय?” असा सवाल केला आहे. या पोस्टनंतर हा विषय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.

गाडीवरील फ्लॅशिंग दिव्यांमुळे वाद

महापौरांच्या नव्या टोयोटा इनोव्हा गाडीवर छतावर लाल दिवा नसला तरी गाडीच्या पुढील भागात लाल आणि निळे फ्लॅशिंग दिवे बसवलेले दिसतात. तसेच त्यांच्या ताफ्यातील एका स्कॉर्पिओ वाहनावरही पोलिस वाहनांसारखे दिवे लावलेले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा व्हीआयपी संस्कृतीला प्रोत्साहन दिल्याची टीका केली जात आहे.

Scroll to load tweet…

सरकारचा नियम काय सांगतो?

1 मे 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सरकारी वाहनांवरील लाल दिव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या नियमानुसार अग्निशमन दल, पोलीस, संरक्षण दल, अर्धसैनिक दल आणि आपत्ती व्यवस्थापन सेवांच्या वाहनांनाच विशेष परिस्थितीत रंगीत दिवे वापरण्याची परवानगी आहे. सामान्य सरकारी वाहनांवर असे दिवे, ध्वज किंवा विशेष चिन्हे वापरणे बेकायदेशीर मानले जाते.

महापालिकेकडून नव्या गाड्यांची खरेदी

दरम्यान, निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेकडून महापौर, उपमहापौर आणि विविध समित्यांच्या अध्यक्षांसाठी 13 नवीन गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. महापौरांसाठी सुमारे 30 लाख रुपये किमतीची टोयोटा इनोव्हा गाडी घेण्यात आली आहे. तर उपमहापौर आणि विविध समित्यांच्या अध्यक्षांसाठी सुमारे 18 लाख रुपये किमतीच्या महिंद्रा स्कॉर्पिओ गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत.