MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • मुंबईकरांची लॉटरी! बीडीडी चाळीतल्या छोट्या खोलीचा वनवास संपला; आता मिळणार हक्काचं मोफत '2 BHK' घर!

मुंबईकरांची लॉटरी! बीडीडी चाळीतल्या छोट्या खोलीचा वनवास संपला; आता मिळणार हक्काचं मोफत '2 BHK' घर!

BDD Chawl redevelopment project: मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत नायगाव येथील रहिवाशांना दिलासा मिळाला. पिढ्यानपिढ्या १६० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या ८६४ कुटुंबांना म्हाडातर्फे ५०० चौरस फुटांचे २ बीएचके घर पूर्णपणे मोफत मिळणार आहे. 

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 15 2026, 03:53 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
मुंबईकरांची लॉटरी! बीडीडी चाळीतल्या छोट्या खोलीचा वनवास संपला
Image Credit : our own

मुंबईकरांची लॉटरी! बीडीडी चाळीतल्या छोट्या खोलीचा वनवास संपला

मुंबई: मुंबईत स्वतःच्या हक्काचं घर असावं, हे प्रत्येक सर्वसामान्याचं स्वप्न असतं. त्यातही दक्षिण मुंबईत हक्काची जागा मिळणं म्हणजे दुग्धशर्करा योगच! पिढ्यानपिढ्या अवघ्या १६० चौरस फुटांच्या खुराड्यात राहणाऱ्या शेकडो कुटुंबांचं नशीब आता फळफळलं आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत (BDD Chawl Redevelopment) नागरिकांना आता चक्क ५०० चौरस फुटांचे अलिशान २ BHK घर मिळणार आहे, तेही पूर्णपणे मोफत! 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
नेमकी कोणाची लॉटरी लागली?
Image Credit : our own

नेमकी कोणाची लॉटरी लागली?

म्हाडामार्फत राबवल्या जाणाऱ्या या महाप्रकल्पात नायगाव येथील रहिवाशांना पहिल्या टप्प्यात या घरांचा ताबा मिळणार आहे. ज्या रहिवाशांनी अनेक वर्षं छोट्या खोल्यांमध्ये काढली, त्यांना आता अत्याधुनिक इमारतीमध्ये राहायला मिळणार आहे. 

Related Articles

Related image1
मुंबईकरांची लाडकी 'वनराणी' पुन्हा धावणार! व्हिस्टाडोम कोच आणि बॅटरीवर चालणारी हायटेक ट्रेन
Related image2
BMC महापौरांच्या गाडीवरील लाल-निळ्या दिव्यांवरून वाद; सोशल मीडियावर जोरदार चर्चा
34
महत्त्वाचे तपशील
Image Credit : Twitter

महत्त्वाचे तपशील

कुठे मिळणार घर? नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प.

किती कुटुंबं ठरणार भाग्यवान? पहिल्या टप्प्यात तब्बल ८६४ पात्र रहिवाशांना घरांच्या चाव्या सोपवण्यात येणार आहेत.

घराचा आकार: पूर्वीच्या १६० चौ. फुटांऐवजी आता ५०० चौ. फूट चटई क्षेत्र (Carpet Area) असलेले मोठे घर मिळेल.

सद्यस्थिती: नायगावमध्ये एकूण २० टॉवर्स उभारले जात आहेत. त्यापैकी पहिल्या इमारतीतील ८ टॉवर्समधील घरांचे वाटप होणार आहे. 

44
उर्वरित घरांचं काय?
Image Credit : Twitter

उर्वरित घरांचं काय?

ज्या रहिवाशांना पहिल्या यादीत स्थान मिळाले नाही, त्यांच्यासाठीही आनंदाची बातमी आहे. प्रकल्पातील उर्वरित ५३७ घरांचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. म्हाडाच्या नियोजनानुसार, एप्रिल महिन्यापर्यंत ही कामे पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लवकरच संपूर्ण नायगाव बीडीडी परिसराचा चेहरामोहरा बदललेला पाहायला मिळेल.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Auto-Taxi Fare Hike : मुंबईत रिक्षा-टॅक्सी प्रवास महागला; किमान भाड्यात वाढ, नवीन दर लागू
Recommended image2
Malad Accident : मालाडमध्ये भीषण अपघात; कारने रिक्षा आणि दुचाकींना उडवलं, महिला वकिलाचा मृत्यू
Recommended image3
Anna Hazare Health : अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली, मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल
Recommended image4
विशाखा राऊत थेट कोर्टात; जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान
Recommended image5
Mumbai Accident : वांद्र्यात महिलेच्या गाडीखाली चिरडून ८ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
Related Stories
Recommended image1
मुंबईकरांची लाडकी 'वनराणी' पुन्हा धावणार! व्हिस्टाडोम कोच आणि बॅटरीवर चालणारी हायटेक ट्रेन
Recommended image2
BMC महापौरांच्या गाडीवरील लाल-निळ्या दिव्यांवरून वाद; सोशल मीडियावर जोरदार चर्चा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved