57 वर्षांपूर्वी राम मंदिराबद्दल करण्यात आली होती भविष्यवाणी, सोशल मीडियावर पोस्टाचे तिकीट व्हायरल

| Published : Jan 17 2024, 12:59 PM IST / Updated: Jan 17 2024, 01:53 PM IST

Ram Mandir Ceremony Postal Stamp

सार

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. पण तुम्हाला माहितेय का, 57 वर्षांपूर्वी राम मंदिराबद्दलची भविष्यवाणी करण्यात आली होती.

Ram Mandir Ceremony : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. अशातच राम मंदिराबद्दलची भविष्यवाणी 57 वर्षांपूर्वी करण्यात आल्याचा खुलासा एका पोस्टाच्या तिकीटातून झाला आहे. पोस्टाच्या तिकीटावर लिहिण्यात आलेल्या भविष्यवाणीत राम मंदिराचे उद्घाटन कधी होणार याबद्दलही सांगण्यात आले होते.

राम मंदिराच्या उभारणीसंदर्भातील पोस्टाचे तिकीट व्हायरल
सध्या सोशल मीडियावर राम मंदिराच्या उभारणीसंदर्भातील एक पोस्टाचे तिकीट व्हायरल होत आहे. जे नेपाळमधून (Nepal) वर्ष 1967 मध्ये जारी करण्यात आले होते. खास गोष्ट अशी की, पोस्टाची ही दुर्मिळ तिकीट उत्तर प्रदेशातील लखनऊमधील (Lucknow) अशोक कुमार यांच्याकडे आहे. 

अशोक कुमार यांनी 'द लिटिल म्युझिअम'मध्ये राम मंदिराच्या भविष्यवाणीसंदर्भातील तिकीट व्यवस्थितीत जपून ठेवली आहे. या तिकीटावर अशा काही गोष्टी लिहिल्या आहेत त्या वाचून सर्वजण हैराण होत आहेत.

57 वर्षांपूर्वी करण्यात आली होती भविष्यवाणी
प्रभू श्रीराम यांच्या संदर्भातील एक पोस्टाची तिकीट 57 वर्षांपूर्वी नेपाळमध्ये जारी करण्यात आली होती. जी आता सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. वर्ष 1967 मध्ये जारी करण्यात आलेल्या या पोस्टाच्या तिकीटावर राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचे वर्ष लिहिण्यात आले आहे. याशिवाय त्यावेळी पोस्टाच्या तिकीटाची किंमत 15 पैसे असायची, ज्यावर रामनवी वर्ष 2024 असे देखील लिहिले आहे.

आणखी वाचा : 

Ram Mandir Pran Pratishtha : मंदिरात आज होणार रामललांचा प्रवेश, जाणून पुढील सोहळ्याचे वेळापत्रक

अयोध्या नगरीत Light and Sound Show पाहण्यासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह, पाहा व्हिडीओ

गीता प्रेसकडून रामचरितमानस 10 भाषांमध्ये मोफत डाउनलोडची सुविधा, अशी मिळवा पुस्तकाची प्रत