सार

अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा वैदिक पद्धतीने पार पडणार आहे. मंदिराच्या धार्मिक विधींना सुरुवात झाली झाली आहे. अशातच रामललांसाठी 12 लाखांहून अधिक भक्तांनी वस्र तयार केले आहे.

Ram Mandir Ceremony : अयोध्येतील राम मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या रामललांसाठी (Ram Lalla) रेशमी धाग्यापासून वस्र तयार करण्यात आले आहेत. खास गोष्ट अशी की, हातमागावर विणकाम करुन रामललांसाठी वस्र 12 लाख 36 हजार 700 भक्तांनी तयार केले आहे. 

गेल्या वर्षात (2023) पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान हातमागावर या वस्राचे विणकाम करण्यात आले होते. रेशमी वस्र तयार करण्यासाठी लहान मुलांपासून ते वयाच्या शंभरी गाठलेल्या नागरिकांनी आपला हातभार लावला आहे.

चॅरिटेबल ट्रस्टने तयार केलेय वस्र
पुण्यातील हेरिटेज हॅण्डव्हिविंग रिवाइव्हल चॅरिटेबल ट्रस्टकडून (Heritage Handweaving Revival Charitable Trust) रामललांसाठी वस्र तयार करण्यात आले आहेत. एकूण आठ जोडी कपडे तयार करुन उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath)  यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.

लखनऊचे मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी 'दोन धागे श्री रामांसाठी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी आणि मार्गदर्शक सुरेश जोशी भैयाजी उपस्थितीत होते.

रामललांच्या बालरुपातील मूर्तीही गाभाऱ्यात स्थापन केली जाणार
अयोध्येत पत्रकार परिषदेला संबोधित करताना मंदिराचे ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी म्हटले की, मूर्तिकार अरुण योगीराज यांच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. ही मूर्ती तयार करण्यासाठी 15-200 किलोंच्या पाषाणाचा वापर करण्यात आला आहे. रामललांच्या बालरुपातील मूर्तीसह गेल्या 70 वर्षांपासून पूजा करण्यात येणाऱ्या मूर्तीचीही स्थापना मंदिराच्या गाभाऱ्यात केली जाणार आहे. प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम 22 जानेवारीला पार पडणार आहे. पण 16 जानेवारीपासून धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे.

आणखी वाचा : 

Odisha : जगन्नाथ पुरी हेरिटेज कॉरिडॉरचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केले उद्घाटन, 800 कोटी रूपयांचा खर्च करून बांधण्यात आलाय प्रकल्प

57 वर्षांपूर्वी राम मंदिराबद्दल करण्यात आली होती भविष्यवाणी, सोशल मीडियावर पोस्टाचे तिकीट व्हायरल

Ram Mandir Pran Pratishtha : मंदिरात आज होणार रामललांचा प्रवेश, जाणून पुढील सोहळ्याचे वेळापत्रक