MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Mumbai Local Mega block: ठाणे-डोंबिवली दरम्यान १० तासांचा विशेष पॉवरब्लॉक; पाहा रद्द झालेल्या गाड्या आणि वेळापत्रक!

Mumbai Local Mega block: ठाणे-डोंबिवली दरम्यान १० तासांचा विशेष पॉवरब्लॉक; पाहा रद्द झालेल्या गाड्या आणि वेळापत्रक!

Mumbai Local Mega block: मध्य रेल्वेने ठाणे आणि डोंबिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी १० तासांचा विशेष पॉवरब्लॉक जाहीर केला आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत चालणाऱ्या या ब्लॉकमुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द झाल्या आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 14 2026, 08:28 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
ठाणे डोंबिवली दरम्यान १० तासांचा विशेष पॉवरब्लॉक
Image Credit : social media

ठाणे-डोंबिवली दरम्यान १० तासांचा विशेष पॉवरब्लॉक

मुंबई: जर तुम्ही आज रात्री किंवा उद्या रविवारी मध्य रेल्वेने प्रवास करणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ठाणे आणि डोंबिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत विशेष पॉवरब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार असून अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

25
ब्लॉकची वेळ आणि ठिकाण
Image Credit : fb

ब्लॉकची वेळ आणि ठिकाण

कालावधी: शनिवारी मध्यरात्री १२:०० ते रविवारी सकाळी १०:०० वाजेपर्यंत (एकूण १० तास).

मार्ग: ठाणे ते डोंबिवली (अप आणि डाऊन धीम्या मार्गावर).

कारण: ठाणे (प्लॅटफॉर्म ३ व ४) आणि डोंबिवली (प्लॅटफॉर्म १, १-A व २) येथील लांबी वाढवण्याचे काम. 

Related Articles

Related image1
मुंबईकरांची लाडकी 'वनराणी' पुन्हा धावणार! व्हिस्टाडोम कोच आणि बॅटरीवर चालणारी हायटेक ट्रेन
Related image2
Mumbai MHADA Lottery 2026: मुंबईकरांचे घराचे स्वप्न होणार साकार! म्हाडाची २५०० घरांसाठी एप्रिलमध्ये लॉटरी; 'या' भागात मिळणार हक्काचे घर
35
प्रवाशांवर होणारा परिणाम
Image Credit : Social media

प्रवाशांवर होणारा परिणाम

१. गाड्या रद्द आणि कपात: अनेक लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत, तर काही गाड्या कुर्ला, ठाणे किंवा कल्याणपर्यंतच चालवल्या जातील (Short Terminate).

२. मार्ग बदल: धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे.

३. कळवा-मुंब्रावासियांना दिलासा: ब्लॉक काळात जलद मार्गावरील लोकलना कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर विशेष थांबा देण्यात आला आहे.

४. या स्थानकांवर लोकल थांबणार नाही: ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर धीम्या मार्गावरील गाड्या थांबणार नाहीत. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. 

45
असे असेल फेरबदल केलेले वेळापत्रक
Image Credit : X(Twitter)

असे असेल फेरबदल केलेले वेळापत्रक

डाऊन धीम्या लोकल: शनिवारी रात्री १०:४९ (परळ) आणि १२:१२ (CSMT) तसेच रविवारी पहाटे ४:४५ (विद्याविहार) आणि ९:०५ (CSMT) सुटणाऱ्या लोकल मुलुंडपासून जलद मार्गावर वळवून पुन्हा ठाण्यापासून धीम्या मार्गावर चालवल्या जातील.

अप धीम्या लोकल: शनिवारी रात्री ११:२६ ते रविवारी सकाळी ९:५५ पर्यंत कल्याणवरून सुटणाऱ्या अप धीम्या लोकल कल्याण ते ठाणे दरम्यान जलद मार्गावर धावतील. 

55
महत्त्वाची सूचना
Image Credit : Getty

महत्त्वाची सूचना

रेल्वेने प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी अधिकृत 'Yatri' ॲप किंवा रेल्वेच्या सूचना तपासून पहा. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी बस सेवांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Marathi Compulsory Rule : मराठी सक्तीवरून शिवसेनेत अंतर्गत मतभेद? निरुपमांचा विरोध, चालकांमध्ये अस्वस्थता वाढली
Recommended image2
‘मराठी सक्ती’वरून वाद तापला; सरनाईकांच्या निर्णयाला निरूपमांचा विरोध, मनसे आक्रमक
Recommended image3
Paneer vs Cheese Analog : प्लेटमधील पनीर खरे की बनावट? आता ग्राहकांना मिळणार स्पष्ट माहिती
Recommended image4
Mumbai Crime : मुंबईत महिला क्रिकेटरकडून उद्योगपतीची 63 लाखांची फसवणूक; सेक्सटॉर्शन प्रकरणात तिघे अटकेत
Recommended image5
महिला आरक्षण मोर्च्यानंतर वाद पेटला; मुंबईतील ट्राफिक कोंडीवरून मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया चर्चेत
Related Stories
Recommended image1
मुंबईकरांची लाडकी 'वनराणी' पुन्हा धावणार! व्हिस्टाडोम कोच आणि बॅटरीवर चालणारी हायटेक ट्रेन
Recommended image2
Mumbai MHADA Lottery 2026: मुंबईकरांचे घराचे स्वप्न होणार साकार! म्हाडाची २५०० घरांसाठी एप्रिलमध्ये लॉटरी; 'या' भागात मिळणार हक्काचे घर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved