घरबसल्या राम मंदिरातील आरतीसाठी लावता येईल उपस्थिती, ऑनलाइन पास मिळवण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो

| Published : Jan 16 2024, 06:08 PM IST / Updated: Jan 16 2024, 06:12 PM IST

Ram Mandir Aarti
घरबसल्या राम मंदिरातील आरतीसाठी लावता येईल उपस्थिती, ऑनलाइन पास मिळवण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

अयोध्येत येत्या 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. अशातच भाविकांमध्ये रामललांच्या दर्शनसाठी मोठी उत्सुकता आहे. पण तुम्हाला घरबसल्या रामललांच्या आरतीला उपस्थितीत राहता येणार आहे.

Ram Mandir Aarti Pass Online Booking : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. अशातच अयोध्येत जोरदार तयारी केली जात आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), व्हीव्हीआयपींसह (VVIP) साधू संत उपस्थितीत राहणार आहेत. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर भाविकांना राम मंदिरात येऊन रामललांचे दर्शन घेता येणार आहे.

अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या धार्मिक विधींना आजपासून (16 जानेवारी) सुरुवात झाली आहे. पण तुम्हाला राम मंदिरातील आरतीसाठी उपस्थितीत राहायचे असल्यास अयोध्येत जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या देखील राम मंदिराच्या आरतीला उपस्थितीत राहू शकता. यासाठी केवळ पुढील काही स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहेत.

राम मंदिराच्या आरतीसाठी फॉलो करा पुढील स्टेप्स

  • सर्वप्रथम राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राची अधिकृत वेबसाइट online.srjbtkshetra.org ला भेट द्या.
  • संकेतस्थळाच्या मुख्य पेजवर तुम्हाला आरतीच्या सेक्शनवर क्लिक करुन पुढील प्रोसेस फॉलो करायची आहे .
  • आरती सेक्शनमध्ये तुम्हाला वेगवेगळे आरतीचे प्रकार पाहायला मिळतील. त्यानुसार तुम्ही आरती सेट करा.
  • आरती पाससाठी तुमचे नाव, फोटो, पत्ता आणि मोबाईल क्रमांकासह अन्य महत्त्वाची माहिती भरा.
  • ऑनलाइन आरतीच्या पासचे बुकिंग कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही निवडलेल्या वेळेत मंदिराच्या आरतीसाठी सहभागी होऊ शकता.

आरतीसाठी कोण उपस्थितीत राहू शकतात?
अयोध्येतील राम मंदिराच्या आरतीसाठी त्याच भाविकांना परवानगी असणार ज्यांच्याकडे आरतीचे पास आहेत. ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीनेही तुम्हाला आरतीचे पास मिळणार आहेत.

कधी सुरू होणार आरतीचे बुकिंग?
राम मंदिरातील आरतीसाठी ऑनलाइन पास बुकिंगसाठी सुरुवात झाली आहे. खरंतर 28 डिसेंबर, 2023 पासूनच आरतीसाठीच्या पासचे बुकिंग सुरू झाले आहे. याशिवाय तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेही आरतीचे पास मिळवू शकता.

आरतीच्या वेळा
रामललांची आरती प्रत्येक दिवशी तीन वेळा होणार आहे. पहिली आरती सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी असणार आहे. दुसरी आरती दुपारी 12 वाजता आणि तिसरी आरती संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी असणार आहे. एकावेळी होणाऱ्या मंदिराच्या आरतीसाठी केवळ 30 भाविकांना उपस्थितीत राहण्याची संधी मिळणार आहे.

आणखी वाचा : 

अयोध्या नगरीत Light and Sound Show पाहण्यासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह, पाहा व्हिडीओ

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत आजपासून धार्मिक विधींना होणार सुरुवात, जाणून घ्या 16-22 जानेवारीपर्यंतच्या सोहळ्याचे वेळापत्रक

गीता प्रेसकडून रामचरितमानस 10 भाषांमध्ये मोफत डाउनलोडची सुविधा, अशी मिळवा पुस्तकाची प्रत