सार

मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे येत्या 19 फेब्रुवारीला उद्घाटन केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

Mumbai Costal Road : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) येत्या 19 फेब्रुवारीला मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. मुंबई महापालिकेकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात फेब्रुवारी महिन्यातच होण्याची शक्यता आहे. कोस्टल रोड सुरू झाल्यानंतर नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येपासून दिलासा मिळणार आहे. मुंबईतील या ड्रीम प्रोजेक्टचे काम अखेरच्या टप्प्यात आले आहे.

कोस्टल रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर 10 किलोमीटरपेक्षा अधिक दूरचे अंतर केवळ 10-12 मिनिटांत पार करता येऊ शकते. कोस्टल रोड 29.2 किलोमीटर लांब असून याचे काम दोन टप्प्यात केले जात आहे. कोस्टल रोडचे संपूर्ण काम झाल्यानंतर 40-45 मिनिटांच्या प्रवासासाठी फार कमी वेळ लागणार आहे.

कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यात 10.58 किलोमीटर लांब पूल तयार केला जात आहे. याशिवाय 2.4 किलोमीटर दूर पर्यंत सागरी बोगदा तयार करण्यात आला आहे. एकूण 13,898 कोटी रुपयांच्या प्रकल्पामध्ये आतापर्यंत 9383 कोटी रुपयांचे काम करण्यात आले आहे. कोस्टल रोडचे काम 84 टक्के पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे.

देशातील पहिला सागरी बोगदा
देशातील पहिलाच सागरी बोगदा तयार करण्यात आला आहे. बोगदा 40 फूट रूंद आहे. कोस्टल रोडची एक बाजू सुरू करण्याची तयारी केली जात आहे. जवळजवळ 14 हजार कोटी रुपयांचा खर्च करुन तयार केल्या जाणाऱ्या कोस्टल रोडचा पहिला टप्पा वरळी (Worli) ते मरीन ड्राइव्ह (Marin Drive) पर्यंत असणार आहे. याशिवाय मरीन ड्राइव्ह ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत दोन बोगदे तयार करण्यात आले आहेत, जे दोन-दोन किलोमीटर लांबीचे आहेत.

1600 गाड्यांसाठी पार्किंग व्यवस्था असणार
कोस्टल रोड प्रकल्पामध्ये तीन इंटरजेंच आहेत. पहिला इंटरजेंच अमरसन्स गार्डन (Amarsons Garden), दुसरा इंटरजेंच हाजी अली आणि तिसरा इंटरजेंच वरळीत आहे. या इंटरजेंचच्या दरम्यान पार्किंग व्यस्थेची सुविधा असणार आहे, जेथे 1600 गाड्या पार्क केल्या जाऊ शकतात. संपूर्ण मार्ग आठ पदरी आणि बोगदा सहा पदरी असणार आहे. याशिवाय बोगद्यात एखादी दुर्घटना घडल्यास तत्काळ मदतीसाठी व्यवस्थाही करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेचे आपत्कालीन नियंत्रण कक्ष, मुंबई अग्निशमन दल, पोलीस तैनात असणार आहेत.

दोन भागात विभागलाय कोस्टल रोडचा प्रकल्प
मुंबई कोस्टल रोड प्रकल्प दोन भागात विभागला गेला आहे. त्यानुसार, दक्षिण आणि उत्तर भागात हा प्रकल्प विभागला गेला आहे. या प्रकल्पामध्ये सर्वप्रथम दक्षिण भागाचे काम सुरू करण्यात आले आहे. मुंबई ते कांदिवली दरम्यान 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प असल्याचे सांगण्यात येत आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प, जो साडेदहा किलोमीटरचा भाग असून मरीन ड्राइव्ह ते प्रिंसेस स्ट्रीट फ्लायओव्हर पासून सुरू होऊन वरळी वांद्रे-सी लिंकपर्यंत असणार आहे.

आणखी वाचा : 

BMC Budget 2024-25 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर, आर्थिक वर्ष 2024-25 साठी 59 हजार कोटींहून अधिक रुपयांची करण्यात आलीय तरतूद

Mumbai : धमकीचे सत्र सुरूच, शहरात सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला मेसेज

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या लढ्याला यश, नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा सरकारचा निर्णय