सार

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त इकबाल चहल यांना सादर करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष वर्ष 2024-25 साठी 59 हजार कोटींहून अधिक रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

BMC Budget 2024-25 : मुंबई महापालिकेने शुक्रवारी (2 जानेवारी) महापालिकेच्या मुख्यलयातील सभागृहात अर्थसंकल्प सादर केला आहे. महापालिका आयुक्त इकबाल चहल (Civic Commissioner Iqbal Singh Chahal) यांना आर्थिक वर्ष 2024-25 साठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या आर्थिक वर्षासाठी 59 हजार 954 कोटी 75 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने रस्ते, आरोग्य, पाणी आणि स्वच्छतेसारख्या सोयी-सुविधांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल यांना सादर करण्यात आलेल्या यंदाचा महापालिकेचा अर्थसंकल्प गेल्या वर्षातील अर्थसंकल्प 2023-24 च्या तुलनेत 10.50 टक्क्यांनी अधिक आहे. याआधीचा महापालिकेचा अर्थसंकल्प 52 हजार 619 कोटी 7 लाख रुपये आकारमान असलेला होता.

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तरतूद
यंदाच्या अर्थसंकल्पात बेस्टसाठी (Brihanmumbai Electric Supply and Transport) अनुदानाच्या रुपात 800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय कोस्ट रोड प्रकल्पासाठी 2900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जी गेल्या अर्थसंकल्पात 3545 कोटी रुपये होती.

आरोग्य आणि बांधकामावर अधिक जोर दिला जाणार
मुंबई महापालिककडून रस्ते आणि पाणी प्रकल्पासारख्या सार्वजनिक पायाभूत सुविधांवर सर्वाधिक खर्च करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी 1915.12 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विभागासाठी 2448.43 कोटी रुपयांती तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय महापालिकेच्या अर्थसंकल्पात मुंबई अग्निशमन दलासाठी 689.99 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रस्ते आणि वाहतूक संचालन विभागासाठी 4350.96 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहर घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी 4878.37 कोटी रुपयांची तरतूद, पूल विभागासाठी 4852.03 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

आणखी वाचा : 

Mumbai : धमकीचे सत्र सुरूच, शहरात सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला मेसेज

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या लढ्याला यश, नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा सरकारचा निर्णय

Sion Road Over Bridge : सायन येथील 110 वर्ष जुना उड्डाण पुल दोन वर्षांसाठी राहणार बंद, या पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना