Mumbai : धमकीचे सत्र सुरूच, शहरात सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला मेसेज

| Published : Feb 02 2024, 11:41 AM IST

Mumbai police

सार

मुंबईला बॉम्बने उडवण्याच्या धमकीचे मेसेज येण्याचे सत्र अद्याप सुरूच आहे. आताही मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा मेसेज पाठवला आहे. या मेसेजमध्ये शहरात सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे म्हटले आहे.

Threat Message to Mumbai Traffic Police :  मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शहराला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. शहरात बॉम्ब ठेवल्याचा मेसेज मिळाल्यानंतर खळबळ उडाली आहे. नियंत्रण कक्षाने याची माहिती मुंबई पोलिसांना दिली आहे. सध्या मुंबई पोलिसांकडून धमकीचा मेसेज पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. धमकीचा मेसेज पाठवत अज्ञात व्यक्तीने म्हटले होते की, शहरात सहा ठिकाणी बॉम्ब ठेवले आहेत.

मुंबई वाहतूक पोलिसांनुसार, अज्ञात व्यक्तीने धमकीचा मेसेज वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला आहे. या मेसेजमध्ये शहरात सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे म्हटले आहे. वाहतूक पोलिसांनी याची माहिती मुंबई पोलीस आणि एटीएसला (ATS) दिली आहे.

गुन्हे शाखेकडून तपास सुरू
धमकीचा मेसेज आल्याने गुन्हे शाखेसह पोलिसांच्या पथकाकडून संशयित ठिकाणी तपास केला जात आहे. अद्याप बॉम्ब ठेवल्यासंदर्भात काही माहिती हाती लागलेली नाही. याशिवाय धमकीचा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला ट्रेस करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

धमक्यांचे मसेज-फोन येण्याचे सत्र सुरूच
मुंबई शहराला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी शहराला बॉम्बने उडवण्याचे फोन-मेसेज मुंबई पोलिसांना आले होते. त्यानंतर संशियित ठिकाणी शोध घेतला असता काहीही सापडले नाही.

आणखी वाचा : 

Viral Video : रहिवाशी इमारतीत तरुणींचा उच्छाद, मध्यरात्री नागरिकांच्या दाराला कडी लावली आणि....

Mumbai : माझ्या सीटखाली बॉम्ब ठेवलाय...प्रवाशाच्या सूचनेनंतर विमानाचे उड्डाण थांबवले, वाचा पुढे काय घडले

Gokhale Bridge : अंधेरीला पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा गोखले पुलाचा एक भाग 25 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न, अमीत साटम यांची माहिती