Manoj Jarange : शंभर टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला मोफत शिक्षण मिळावे, वाचा मनोज जरांगेंच्या जाहीर सभेतील महत्त्वाचे मुद्दे

| Published : Jan 26 2024, 12:44 PM IST / Updated: Jan 26 2024, 04:23 PM IST

Manoj Jarange
Manoj Jarange : शंभर टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला मोफत शिक्षण मिळावे, वाचा मनोज जरांगेंच्या जाहीर सभेतील महत्त्वाचे मुद्दे
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन हजारो समर्थकांसोबत मनोज जरांगे पाटील वाशीत दाखल झाले आहेत. मनोज पाटील यांची वाशीतील शिवाजी चौकात सभा पार पाडली. या सभेदरम्यान, मनोज जरांगेने सरकारला अध्यादेश काढण्यासाठी उद्या 11 वाजेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. 

Manoj Jarange in Navi Mumbai : छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या जाहीर सभेला सुरुवात केली. सरकारसोबत आपल्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेचा सारासार निर्णय घेऊन तुमच्या समोर आलोय असे जरांगेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हटले. 

 54 लाख नोंदी मराठ्यांच्या (कुणबी) सापडल्याचे जरांगेंनी म्हटले. याशिवाय एका नोंदींवर पाच जणांना आरक्षण मिळणार आहे. आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी अर्ज करा. आतापर्यंत 37 लाख जणांचा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. पण 37 लाख प्रमाणपत्र कोणाल दिले याचा डेटा जरांगेंनी सरकाकडे मागितला आहे. इतरांना का दिले नाही? असा सवालही जरांगेंनी सभेदरम्यान उपस्थितीत केला.ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागणार आहे. अन्यथा प्रमाणपत्र मिळणार नसल्याचे जरांगेंनी म्हटले आहे.

शिंदे समितीची मुदत वर्षभरासाठी वाढवावी अशी मागणी देखील मनोज जरांगेंनी सभेवेळी केली आहे. याशिवाय सगे सोयऱ्यासोबतचा अद्यादेशही काढावा. ज्यांची कुणबी नोंद मिळेल त्यांच्या सगे सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र मिळावे अशी मागणीही जरांगेंनी सरकारकडे केली आहे.

शंभर टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला मोफत शिक्षण मिळावे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. भरतीवेळी मराठी समाजाच्या जागा राखीव ठेवाव्यात. आपल्या मागण्या मान्य केल्या असल्या तरीही त्यासंबंधित शासन निर्णय काढावा असे देखील जरांगेंनी सभेवेळी म्हटले आहे.

मनोज जरांगेंनी पुढे म्हटले की, सगळ्या मागण्यांचा अध्यादेश काढावा. एकही मराठा आरक्षणापासून वंचित ठेवणार नाही असा शब्द मी देतो. आज रात्रीपर्यंत आम्हाला हा अध्यादेश द्यावा अशी मागणी मनोज जरांगेंनी सरकारकडे केली आहे. अध्यादेश दिला नाही तर उद्या मुंबईत धडकणार असल्याचे जरांगेंनी म्हटले आहे.

अध्यादेश काढण्यासाठी सरकारला उद्या 11 वाजेपर्यंतची नवी वेळ मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. अध्यादेश काढल्यास गुलाल उधळायला आझाद मैदानावर येणारच. पण अध्यादेश काढला नाही तरीही आझाद मैदानावर येणार. पण मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी फिरणार नसल्याचेही जरांगेंनी जाहीर सभेत म्हटले आहे.

मनोज जरांगेंनी नवी मुंबईतील जाहीर सभेत सरकारकडे केल्यात या मागण्या

  • नोंद सापडणाऱ्यांच्या सग्या सोयऱ्यांना सरसकट प्रमाणपत्र द्यावे
  • शपथपत्र घेऊन सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्यावे
  • कोर्टामध्ये आरक्षण मिळेपर्यंत तरुण-तरुणींना शंभर टक्के शिक्षण मोफत करावे
  • आरक्षण मिळेपर्यंत शसकीय भरती करू नका. मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवाव्यात
  • आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे रद्द करावेत
  • रात्रीपर्यंत शासनाने अध्यादेश देण्याची मागणी

दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया
 मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात मंत्री दीपक केसरकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. केसकर यांनी म्हटले की, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले की, आपण 37 लाख कुणबी प्रमाणपत्र दिले. पण आता आणखी दिले जाणार असून कुणबी प्रमाणपत्राचा आकडा 50 लाखांच्यावर जाणार आहे. याशिवाय मनोज जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावे असेही आवाहन केसरकर यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
 आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. पण आंदोलन शांततेत पार पडले पाहिजे. याशिवाय मराठा आरक्षणासंदर्भातील प्रश्न कसे सोडवता येतील याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

आणखी वाचा : 

मुंबई पोलिसांच्या 28 जानेवारीपर्यंतच्या सर्व सुट्ट्या या कारणास्तव रद्द

Gokhale Bridge : अंधेरीला पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा गोखले पुलाचा एक भाग 25 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न, अमीत साटम यांची माहिती

Atal Setu Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल सेतूचे उद्घाटन, मुंबई ते नवी मुंबईदरम्यानचा प्रवास 20 मिनिटांत होणार