मुंबई पोलिसांच्या 28 जानेवारीपर्यंतच्या सर्व सुट्ट्या या कारणास्तव रद्द

| Published : Jan 23 2024, 01:10 PM IST / Updated: Jan 23 2024, 01:47 PM IST

Mumbai-police-threat-message-ahead-of-semi-final-match

सार

मुंबई पोलिसांच्या  येत्या 28 जानेवारीपर्यंत सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईत होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 

Mumbai Police Leaves Cancelled : मुंबईत पुढील काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या कारणास्तव मुंबई पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या येत्या 28 जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. यादरम्यान मुंबई पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुट्टी घेता येणार आहे. पोलिसांच्या सुट्ट्यांसंदर्भातील निर्देश गृह विभागाने पोलिस महासंचालक कार्यालयाला दिले आहेत.

सोमवारी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, कोणतीही अनुचीत घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून सुरक्षिततेसंदर्भात तयारी करण्यात आली होती.

मुंबई पोलिसांच्या 28 जानेवारीपर्यंत सुट्ट्या रद्द
राम मंदिरानंतर आता येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जाणार आहे. याशिवाय मराठा आंदोलनकर्ते मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईत दाखल होणार आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) देखील 27 जानेवारीपर्यंत मुंबईत येणार असून आझाद मैदानावर (Azad Maidan) आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अशातच मराठा आरक्षणाची मागणी करणारे आंदोलन शांततने पार पडणे आवश्यक आहे.

पोलिसांच्या सुट्ट्यांबद्दलचे परिपत्रक जारी
मुंबईत कोणत्याही प्रकारची अनुचीत घटना घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचे पालन होण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बलाची गरज भासणार आहे. यामुळेच येत्या 28 जानेवारीपर्यंत सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

पोलिसांच्या सुट्ट्यांबद्दलचे परिपत्रक पोलीस आयुक्तालय, नक्षल विरोधी अभियान, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, राज्य राखीव पोलीस दल आणि गुप्तवार्ता विभागाला जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकात कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना 20 ते 28 जानेवारीपर्यंत सुट्टी घेता येणार नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा : 

Gokhale Bridge : अंधेरीला पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा गोखले पुलाचा एक भाग 25 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न, अमीत साटम यांची माहिती

Sion Road Over Bridge : सायन येथील 110 वर्ष जुना उड्डाण पुल दोन वर्षांसाठी राहणार बंद, या पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना

मुंबईकरांसाठी अटल सेतू बनला पिकनिक स्पॉट, सेल्फी काढण्यासाठी थांबल्यास पोलिसांकडून दाखल केला जाणार FIR