Atal Setu Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल सेतूचे उद्घाटन, मुंबई ते नवी मुंबईदरम्यानचा प्रवास 20 मिनिटांत होणार

| Published : Jan 12 2024, 05:21 PM IST / Updated: Jan 12 2024, 05:27 PM IST

PM Modi in Mumbai
Atal Setu Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल सेतूचे उद्घाटन, मुंबई ते नवी मुंबईदरम्यानचा प्रवास 20 मिनिटांत होणार
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अटल सेतूचे लोकार्पण करण्यात आले आहे. सहा पदरी असलेल्या या सेतूच्या बांधकामासाठी 17,840 कोटी रूपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. मुंबई ते नवी मुंबईदरम्यानचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत नागरिकांना करता येणार आहे.

Mumbai Trans Harbour Link :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी (12 जानेवारी) मुंबईत अटल बिहारी वाजपेयी शिवडी-नाव्हाशेवा सागरी सेतूचे (Atal Bihari Vajpayee Shivadi Nhava Sheva) उद्घाटन केले आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे वर्ष 2016 मध्ये भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. अटल सेतूच्या बांधकामासाठी 17,840 कोटी रूपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. अटल सेतू 21.8 किलोमीटर रूंद आणि सहा पदरी आहे.

अटल सेतूमुळे मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यानची कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. याशिवाय मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतात प्रवास करण्यासाठी लागणारा वेळही कमी होणार आहे. अटल सेतू आजपासूनच नागरिकांना प्रवाशांसाठी सुरू केला जाणार आहे.

अटल सेतूबद्दलच्या खास गोष्टी

  • अटल सेतूचा 16.6 किलोमीटरचा हिस्सा समुद्रावरुन आणि 5.5 किलोमीटरचा हिस्सा जमिनीवरुन जातो. अटल सेतूवरुन प्रतिदिन 70 हजारांहून अधिक गाड्या धावू शकतात.
  • अटल सेतूमुळे मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळामधील अंतर कमी होणार आहे.
  • मुंबई ट्रान्स हार्बर लिंक उभारण्यासाठी जवळजवळ 177,903 मॅट्रिक टन स्टील आणि 504,253 मॅट्रिक टन सिमेंटचा वापर करण्यात आला आहे.
  • मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर चारचाकी वाहनांसाठीचा वेग अधिकाधिक 100 किमी प्रति तास ठेवण्यात आला आहे.
  • मोटरसायकल, ऑटो-रिक्षा आणि ट्रॅक्टरला या सेतूवर प्रवास करण्यास बंदी असणार आहे.
  • कार, टॅक्सी, हलकी वाहने, मिनी बस आणि टू-एक्सल बससाठीचा वेग 100 किमी प्रति तास असणार आहे.
  • अटल सेतूवरुन प्रवास करण्यासाठी 250 रूपयांचा टोल द्यावा लागणार आहे.

आणखी वाचा : 

Atal Setu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार अटल सेतूचे उद्घाटन, जाणून घ्या खासियत

फ्रान्समध्ये अडकलेले विमान मुंबईत दाखल, 276 प्रवासी परतले

Mumbai Deep Cleaning Drive : मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता मोहिमेसाठी जुहू चौपाटीवर स्वतः चालवलं क्लिनिंग मशीन