Gokhale Bridge : अंधेरीला पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा गोखले पुलाचा एक भाग 25 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न, अमीत साटम यांची माहिती

| Published : Jan 18 2024, 04:42 PM IST / Updated: Jan 18 2024, 04:46 PM IST

Ghokhale Bridge
Gokhale Bridge : अंधेरीला पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा गोखले पुलाचा एक भाग 25 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न, अमीत साटम यांची माहिती
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

अंधेरीला पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणारा गोखले पुल आता लवकरच नागरिकांसाच्या सेवेसाठी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. याबद्दल आमदार अमीत साटम यांनी ट्विट करत पुलासंदर्भातील एक अपेडट दिली आहे.

Gokhale Bridge Construction : अंधेरीला पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणारा गोखले पुलाचा एक भाग नागरिकांसाच्या सेवेसाठी लवकरच सुरू होऊ शकतो. अशातच आमदार अमीत साटम (MLA Ameet Satam) यांनी एक ट्विट करत गोखले पुलाबद्दल अपडेट दिली आहे.

अमित साटम यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, “महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal), महापालिकेचे अधिकारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांची गोखले पुलाच्या पुर्नबांधणीसंदर्भात एक बैठक झाली. महापालिकेकडून पुलासंदर्भातील एक परिपत्रक लवकरच जारी केले जाईल. याशिवाय येत्या 25 फेब्रुवारीपर्यंत गोखले पुलाच्या एका भागाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे."

वर्ष 2022 मध्ये बंद करण्यात आला होता पुल
वर्ष 1975 मध्ये उभारलेल्या गोखले पुलाचा एक हिस्सा 3 जुलै 2018 रोजी कोसळला गेला होता. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला होता. रेल्वे मार्गावरुन जाणारा पुल धोकादायक असल्याने मुंबई महापालिकेने 7 नोव्हेंबर, 2022 रोजी नागरिकांच्या सेवेसाठी बंद केला होता.

गोखले पुल बंद केल्यानंतर पुर्नबांधणीचे काम 1 एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आले होते. महापालिकेने गोखले पुल गेल्या वर्षातच (2023) नागरिकांसाठी सुरू होईल असा दावा केला होता.

वाहतूक कोंडीचा नागरिकांना करावा लागत होता सामना
गोखले पुल बंद केल्यानंतर नागरिक अन्य पर्यायी मार्गांचा वापर करत होते. याशिवाय वांद्रे ते बोरिवली पर्यंत नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. याशिवाय गोखले पुल बंद केल्याने सर्वाधिक वाहतूक कोंडी अंधेरी ते जुहू, वर्सोवा ते जोगेश्वरी येथे होत होती.

मुख्यमंत्री एकनाश शिंदेंनी गोखले पुलाचे केले होते निरीक्षण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाले स्वच्छता मोहीमेवेळी गोखले पुलाच्या कार्याचे निरीक्षण केले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना पुलाचे काम लवकरच पूर्ण केले जाईल असे सांगण्यात आले होते.

आणखी वाचा : 

Sion Road Over Bridge : सायन येथील 110 वर्ष जुना उड्डाण पुल दोन वर्षांसाठी राहणार बंद, या पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना

मुंबईकरांसाठी अटल सेतू बनला पिकनिक स्पॉट, सेल्फी काढण्यासाठी थांबल्यास पोलिसांकडून दाखल केला जाणार FIR

Parel Bridge Accident : मुंबईतील परळ पुलावर मोटरसायकल आणि डंपरमध्ये जोरदार धडक, अपघातात तिघांचा मृत्यू