उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते एशियानेट न्यूज डिजिटलची मराठी वेबसाइट लाँच

| Published : Dec 05 2023, 11:15 PM IST / Updated: Dec 06 2023, 10:22 AM IST

Asianet News Marathi

सार

Asianet News Digital : एशियानेट न्यूज डिजिटलने आपली मराठी भाषेतील वेबसाइट लाँच केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. 

Asianet News Marathi : एशियानेट न्यूज मीडिया आणि एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडने (ANMEPL) आपल्या ‘Asianetnews.com’ डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आणखी एका भाषेचा समावेश केला आहे. कंपनीने आपली मराठी भाषेतील वेबसाइट लाँच केली आहे. ५ डिसेंबर २०२३ रोजी मुंबईतील प्रेस क्लब येथे हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. तसेच श्री. डॉ. रामनाथ सोनवणे (सचिव, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण), अभिनेते व दिग्दर्शक श्री. प्रवीण दबास आणि श्रीमती प्रीती झंगियानी या दिग्गजांनीही सोहळ्यात पाहुणे म्हणून हजेरी लावली होती.

Asianetnews.com वेबसाइट मल्याळम, कन्नड, इंग्रजी, हिंदी, तेलुगु, तमिळ आणि बंगाली या भाषेमध्ये आधीपासूनच अस्तित्वात आहेत. मराठी भाषेतील वेबसाइट लाँच करून, समूहाच्या डिजिटल न्यूज मीडियाने आपले पंख देशाच्या पश्चिम भागात पसरवले आहेत. हे महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकून राष्ट्रीय तसंच जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवण्याचे समूहाचे उद्दिष्ट आहे.

'Asianetnews.com'ची मजबूत ब्रँड विश्वासार्हता आणि सखोल प्रादेशिक अंतर्दृष्टीमुळे स्त्रोत तसेच माहिती मांडण्याच्या पद्धतीमध्ये इतरांपेक्षा वेगळेपण प्राप्त होते. Asianetnews.com मराठी आपले ठरवलेले लक्ष्य साध्य करण्यासाठी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी आणि व्हिडीओ कंटेंटवर लक्ष केंद्रित करेल.

माननीय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, बनावट काँटेंटवर आळा घालण्यासाठी, 'एशियानेट न्यूज'सारख्या खऱ्या घडामोडींची माहिती देणाऱ्या प्लॅटफॉर्म्सची गरज आहे. विशेषतः AI आधारित प्लॅटफॉर्म्स उदाहरणार्थ डीपफेक व अन्य तशाच प्रकारच्या भारतीय अ‍ॅप्समुळे निर्माण झालेला धोका पाहता, यावर आळा घालण्याची गरज आहे”. चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी, जगभरात स्थायिक असलेल्या मराठी लोकांपर्यंत विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी आणि समाजाचे योग्य मत तयार करण्यात मदत करण्यासाठी डिजिटल मीडियाने बजावलेली महत्त्वाची भूमिकाही त्यांनी यावेळेस अधोरेखित केली.

Tweet:

 

Tweet:

 

एशियानेट न्यूज ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन राजेश कालरा यांनीही विकासामागील विचारप्रक्रियेबाबत म्हटले की, “महाराष्ट्र हे सर्वाधिक इंटरनेटचा वापर करणारे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी ही देशासाठी महत्त्वाची भाषा आहे. जेव्हा आम्ही अन्य भाषांमध्ये विस्तार करण्याचा विचार करत होतो, त्यावेळेस मराठी या भाषेची आम्ही सर्वांनी एकमताने निवड केली. महाराष्ट्रीयन लोकांसाठी बातम्यांचा सर्वात विश्वासार्ह स्त्रोत होण्याचे व उच्च दर्जाच्या माहितीचा प्रसार करणारे प्लॅटफॉर्म प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे”.

एशियानेट न्यूज ग्रुपचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नीरज कोहली यांनी यावेळेस म्हटले की, “आमच्या अन्य सात भाषांच्या वेबसाइट्सना मिळालेल्या यशाप्रमाणेच मराठी भाषेची वेबसाइटही यशस्वी करण्याचे तसेच महाराष्ट्रातील जनतेने आमच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचे आमचे ध्येय आहे. प्रेक्षकांना सर्वात व्यापक, अप-टु-डेट आणि खरी माहिती पुरवण्यावरच आमचे कायम लक्ष केंद्रित असते".

एशियानेट न्यूज ग्रुपचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर समर्थ शर्मा यांनी कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना म्हटले की, “जगभरात असलेल्या मराठी वाचकांपर्यंत आम्ही थेट, बिनधास्त व अथकपणे बातम्या पोहोचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत. पत्रकारांची एक मजबूत टीम चोवीस तास काम करत असून आमचे न्यूज ब्युरो एशियानेट न्यूज मराठीला बातम्यांचा सर्वात विश्वासार्ह स्त्रोत म्हणून स्थापित करण्यासाठी सज्ज आहे”. अशा पद्धतीने मराठी भाषेतील प्लॅटफॉर्म लाँच करण्यामागील कंपनीचे ध्येय व विचारधारा समर्थ शर्मा यांनी यावेळेस अधोरेखित केली.

AsianetNews.com हे एक आघाडीचे बातम्यांचे प्लॅटफॉर्म आहे, जे सात भाषांमधील तब्बल 80 मिलियन अ‍ॅक्टिव्ह युजर्संना घडामोडींची सविस्तर माहिती पुरवते. विस्तारणाऱ्या क्षेत्रात आता मराठी भाषेचा समावेश करून हे प्लॅटफॉर्म देशात तसेच जगभरात आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाले आहे.

ANN समूहाचे (Asianet News Network) देशभरात वेगवेगळ्या भाषांमध्ये मल्टी-मीडिया प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. जसे की टीव्ही चॅनेल (एशियानेट न्यूज आणि एशियानेट सुवर्णा न्यूज) प्रिंट पब्लिकेशन (कन्नड प्रभा), म्युझिक प्लॅटफॉर्म (इंडिगोम्युझिक डॉटकॉम) आणि आठ भाषांमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. (AsianetNews.com आणि MyNation.com).

आणखी वाचा: 

Voter Registration : समाजकल्याण विभागामार्फत तृतीयपंथी मतदारांच्या नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन

Nagpur News : गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे भूमिपूजन\

‘शासन आपल्या दारी’ शेतकऱ्याच्या आयुष्यात चमत्कार करी, सरकारी योजनेमुळे आले शेतकऱ्याला अच्छे दिन