सार

Nagpur News : नागपुरातील गरजू रूग्णांच्या सेवेसाठी गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे.

Gangadhar Rao Fadnavis Memorial Diagnostic Center : श्री. सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनच्यावतीने गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

“सामान्य माणसाला न्याय देण्याचे निर्णय घेताना आरोग्य सेवेला प्राधान्य दिले आहे. राज्यातील गरीब आणि गरजू रूग्णांना अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा (Medical Help) उपलब्ध होण्यासाठी जिल्हा स्तरावर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बदलती जीवनशैली तसेच वातावरणातील बदलामुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाच्या रूग्णांच्या निदानासाठी अत्याधुनिक रुग्णालयांची आवश्यकता आहे. गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरमुळे या कामास प्रोत्साहन मिळेल”,असा विश्वास यावेळेस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला

या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. “जीव वाचवणाऱ्या आरोग्य सेवा गरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटर महत्त्वाची भूमिका बजावेल. विदर्भातील जनतेपर्यंत या सेंटरच्या माध्यमातून उत्तम आरोग्य सेवा पोहोचणार आहेत”, असे विधान गडकरी यांनी यावेळेस केले.

“जनतेला परवडणाऱ्या आरोग्य सुविधा”

अन्न ,वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसोबत बदलत्या काळानुसार शिक्षण,आरोग्य, रोजगार हे देखील महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. सामान्य जनतेला परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन तत्पर आहे. याचसोबत खासगी आणि सेवाभावी संस्थांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. सर्वसामान्यांना आरोग्यावर खर्च करावा लागतो. हा खर्च टाळणे शक्य आहे. अशा संस्थांच्या मागे समाजानेही उभे राहण्याची आवश्यकता आहे. गरीब रुग्णांना नि:शुल्क सेवा उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Ddevendra fadnavis) यांनी यावेळेस व्यक्त केली.

दरम्यान, श्री.सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटर येत्या सहा महिन्यात पूर्ण करून याचे लोकार्पण करण्यात येईल, असे सांगितले.

आणखी वाचा :

Cleanliness Drive : मुंबईचा कायापालट करण्यासाठी ‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’ महत्त्वाची – मुख्यमंत्री

Sion Hospital News : सायन हॉस्पिटलमध्ये लवकरच 1200 खाटा होणार उपलब्ध - मुख्यमंत्री

Ratnagiri Government Medical College : रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण