सार

Maharashtra Government Schemes: महाराष्ट्रातील नागरिकांना शासकीय योजना आणि कागदपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान सुरू करण्यात आले. या अभियानामुळे पाटण तालुक्यातील शेतकरी महेश निकम यांची आर्थिक परिस्थिती बदलली गेली.

Shasan Aplya Dari Yojana: शासन आपल्या दारी योजना (Shasan Aplya Daari) अभियानाच्या माध्यमातून आजवर कित्येक शेतकऱ्यांनी लाभ घेऊन स्वतःचे आयुष्य बदलले आहे. पाटण तालुक्यातील उरुल येथील शेतकरी महेश निकम (Mahesh Nikam) देखील हे त्यापैकीच एक आहेत. निकम यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या (Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal) माध्यमातून व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ मिळाले. ज्यामुळे महेश निकम आज हे यशस्वीरित्या पशूपालनाचा व्यवसाय (Farming Business) करत आहेत.

निकम हे साडेचार एकर क्षेत्रात उसाची शेती (Sugarcane farming) करत होते. पण याद्वारे पुरेसा नफा होत नसल्याने त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत होता. यावर उपाय म्हणून त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती मिळवली. या महामंडळाच्या माध्यमातून त्यांना कर्ज मिळाले. आर्थिक मदत मिळाल्याने निकम आज महिन्याकाठी 25 ते 30 हजार रूपयांचे उत्पन्न कमवत आहेत.

शासकीय योजनेमुळे झाला फायदा

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून निकम यांना 6 लाख रूपयांचे कर्ज मिळाले. कर्जाच्या मिळालेल्या रकमेतून महेश यांनी चांगला गोठा बांधून दोन गाई देखील विकत घेतल्या. या गाई दररोज जवळपास 25 ते 30 लिटर दूध देताहेत. गाईचे दूध डेअरीपर्यंत पोहोचून निकम चांगला नफा मिळत आहेत.

आर्थिक परिस्थिती सुधारली

शासनाच्या योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या कर्जामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली, अशी भावना निकम यांनी व्यक्त केली आहे. तसेच समाजातील तरुण-तरुणींनीही या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, असा सल्लाही त्यांनी दिलाय. दरम्यान, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना कर्ज दिले गेले आहे.

Content/Photo Credit : महासंवाद वेबसाइट

आणखी वाचा :

शुद्ध-नैसर्गिक मध खरेदी करायचंय? मग कोल्हापुरातल्या या गावाला नक्की द्या भेट

वाचनाची आवड आहे? राज्याच्या या शहरात उभारलीय चक्क पुस्तकांची बाग

बाल स्वास्थ्य योजना गांगुर्डे कुटुंबासाठी ठरली संजीवनी! मुलाला श्रवणशक्ती मिळाल्याने आयुष्यच बदललं