सार

Voter Registration Camp : पुण्यामध्ये प्रशासनाच्या वतीने तृतीयपंथी मतदारांच्या नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष मतदार नोंदणी शिबिरात एकूण 103 तृतीयपंथी मतदारांची नोंदणी करण्यात आली.

Third Gender Voter ID Registration: विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत तृतीयपंथी मतदारांची मतदार नोंदणी वाढवण्याच्या अनुषंगाने सहायक आयुक्त, समाज कल्याण पुणे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांची मतदार नोंदणी वाढवण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 24 नोव्हेंबर रोजी संगमवाडी कॉर्नर, 2 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन येरवडा तसंच 3 डिसेंबरला ढमढरे बोळ बुधवार पेठ येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिरात समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची अशा एकूण 10 पथकांनी सहभाग घेतला. पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpari-Chinchwad) शहरातील विविध भागातील तृतीयपंथी मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची मतदार नाव नोंदणी करण्याची मोहीम राबवण्यात आली.

या वैशिष्ट्यपूर्ण मोहिमेला तृतीयपंथीयांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. मतदार नोंदणी शिबिरे यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्वीप समन्वयक उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, पुण्यातील युवक विकास आणि उपक्रम केंद्र व पुणेरी प्राइड फाऊंडेशन सिंहगड रोड पुणे या सामाजिक संस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 9 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील तृतीयपंथीयांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, पुणे सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर (येरवडा, पुणे) या कार्यालयाशी संपर्क करून जास्तीत जास्त मतदार नाव नोंदणी करावी, असे आवाहन पुणे जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

आणखी वाचा:

Cleanliness Drive : मुंबईचा कायापालट करण्यासाठी ‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’ महत्त्वाची – मुख्यमंत्री

बाल स्वास्थ्य योजना गांगुर्डे कुटुंबासाठी ठरली संजीवनी! मुलाला श्रवणशक्ती मिळाल्याने आयुष्यच बदललं

Success Story : कलेतून घडवला स्वतःचा बिझनेस, वाचा माळशेज घाटातील तरूणाची प्रेरणादायी कहाणी