सार

Pune : पुणे येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळताना 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत.

Pune : पुण्यातील एका 11 वर्षीय मुलाचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटना लोहगाव येथील असल्याचे सांगितले जात आहे. मुलाच्या गुप्तांगाला बॉल लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

मुलाच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. मृत मुलाचे नाव शौर्य उर्फ शंभू कालिदास खांडवे असल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रिपोर्ट्सनुसारस शौर्य काही मित्रांसोबत क्रिकेटचा सराव करत होता.

नक्की काय घडले?
रिपोर्ट्सनुसार, शौर्य गोलंदाजी करत होता आणि दुसरा मुलगा फलंदाजी करत होता. शौर्यने गोलंदाजी केली असताना त्याच्या गुप्तांगाला वेगाने आलेला बॉल लागला आणि जमिनीवर कोसळला गेला. यानंतर शौर्यच्या मित्रांना नक्की काय झाले हे कळले नाही. यानंतर दुसऱ्या क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना बोलावले आणि शौर्यला नक्की काय झालेय हे पाहण्यास सांगितले.

शौर्यला रुग्णालयात धावतधावत नेले पण तोवर फार उशीर झाला होता. शौर्य उर्फ शंभूचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांकडून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आणखी वाचा : 

Water Crisis : सोलापूरात भीषण पाणी टंचाई, कडाक्याच्या उन्हात नागरिकांची पाण्यासाठी वणवण

पुण्यातील कोचिंग सेंटरच्या 50 विद्यार्थ्यांना विषबाधा, रुग्णालयात दाखल; पोलिसांनी दिली ही मोठी अपडेट