पुण्यातील कोचिंग सेंटरच्या 50 विद्यार्थ्यांना विषबाधा, रुग्णालयात दाखल; पोलिसांनी दिली ही मोठी अपडेट

| Published : Apr 22 2024, 10:49 AM IST / Updated: Apr 22 2024, 10:55 AM IST

hospital

सार

Pune : पुण्यातील एका खाजगी कोचिंग सेटरच्या 50 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Pune News : पुण्यातील एका खाजगी कोचिंग सेंटरच्या 50 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना पोट बिघडणे आणि मळमळ होण्याचा त्रास सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबद्दलची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली असून सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.

नक्की काय घडले?
रिपोर्ट्सनुसार, खेड तालुक्यातील खाजगी केंद्राने 500 पेक्षा अधिक विदार्थ्यांना बोर्डिंगची सुविधा दिली. येथे संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) आणि राष्ट्रीय पात्रतेसह प्रवेश परीक्षेची (NEET) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवले जाते. शुक्रवारी (19 एप्रिल) रात्री कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थी जेवले. यानंतर दुसऱ्या दिवशी 50 हून अधिक विद्यार्थ्यांना पोट दुखी, उलटी आणि मळमळे असा त्रास होऊ लागला. विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची लक्षणे दिसून येत होती.

अन्नपदार्थांचे नमूने चाचणीसाठी पाठवले
एका पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. याशिवाय अन्नपदार्थांचे नमूने चाचणीसाठी पाठवण्यात आले असून या प्रकरणात अधिक तपास केला जातोय.

मिड-डे मीलच्या खिचडीत सापडला उंदीर
गेल्या काही महिन्याआधी महाराष्ट्रातील अकोला शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मिड-डे मीलच्या खिचडीत उंदीर सापडला होता. खरंतर अकोल्यातील महापालिकेच्या शाळेतील मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या खिचडीमध्ये उंदीरचे काही अंश शिजल्याची माहिती मिळाली होती. अशा खिचडीचे मुलांनी सेवन केले असता त्यांचे पोट बिघडले आणि उलट्या होऊ लागल्या. या प्रकरणात दहा मुलांना वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आणखी वाचा : 

Pune : पुण्यात दोन घटनेत ६५ लाखांची रोकड जप्त ; आचारसंहिता काळातील नियम जाणून घ्या नाही तर,रोकड होईल जप्त

पुणे येथे बनावट शेअर ट्रेडिंग रॅकेटचा पोलिसांकडून भांडाफोड, पाच जणांना अटक