सार
सोलापूरातील काही जिल्ह्यांमध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. येथील नागरिकांना दररोज पाण्यासाठी मोजावे लागत आहेत.
Water Crisis in Solapur : एकाबाजूला उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले आहे. दुसऱ्या बाजूला सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक वाढत चालली आहे. अशातच सोलापूरातील जवळजवळ शंभरहून अधिक गावांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय. याच स्थितीवर एका स्थानिक महिलेने भाष्य केले आहे.
सोलापूरात भीषण पाणी टंचाईची समस्या
सोलापूरात राहणाऱ्या मालन बाई यांनी म्हटले की, "आम्हाला 15 दिवसातून एकदा पाण्याचा पुरवठा केला जातो. आम्हाला पाण्याचा जपून वापर करावा लागतो. शिल्लक राहिलेल्या पाण्याने आम्हाला भांडी धुवावीत लागतायत. पिण्याच्या पाण्यासाठी 20 रुपये दररोज मोजावे लागत आहेत. खरंतर, पाणी टंचाईची समस्या माझे गावात लग्न झाल्यापासून सहन करत आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय नेतेमंडळी मत मागण्यासाठी येतात. पण त्यानंतर गावात फिरकत सुद्धा नाहीत."
उजनी धरणातील पाण्याच्या पातळीत घट
सध्याच्या कडाक्याच्या उन्हामुळे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पार जात असल्याचे सोलापूरात दिसून येत आहे. जिल्ह्यातील करमाळा, सांगोला आणि माळशिरस तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात टँकर सुरू आहेत. याशिवाय जिल्ह्यातील उजनी धरणातील पाण्याची पातळी खाली गेली आहे.अशातच सोलापूरमधील पाच जिल्हे दुष्काळग्रस्त यादीत आले आहेत. यामध्ये बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा आणि माढा या तालुक्यांचा समावेश आहे.
गावागावातील विहिरी, नदी-ओढ्यांमधील पाणीही गोठले आहे. अशातच नागरिकांना टँकरच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला जातोय. गावकऱ्यांनी शेतीही करणे बंद केलेय. खरंतर, सोलापूरातील काही गावांना प्रत्येक 15 दिवासांनी पाण्याच्या टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे.
पाणी टंचाई मोठी समस्या
देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होतोय. पण सोलापूरात भीषण टंचाईची समस्या कायम आहे. येथील नागरिक पाण्यासाठी वणवण करत आहेत. याशिवाय नेतेमंडळी पाण्याची समस्या सोडवतील याची अपेक्षाही करणे स्थानिकांनी सोडले आहे. सोलापूरात एवढी भीषण पाणी टंचाई आहे की, दररोज पाण्यासाठी झगडावे लागत आहेत.
आणखी वाचा :
मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना बसणार उन्हाचा तडाखा, हवामान खात्याचा इशारा