सार

मुंबईत शुक्रवारी पेट्रोलचे दर 104.21 रुपये प्रति लीटर झाले आहेत. गुरुवारी पेट्रोलचे दर 106.31 रुपये होते.

Petrol-Diesel Price in Maharashtra : लोकसभा निवडणुकीआधी देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर दोन रुपयांनी कमी झाले आहेत. मुंबईत शुक्रवारी (15 मार्च) पेट्रोलचे दर 104.21 रुपये प्रति लीटर असून, 14 मार्चला हेच दर 106.31 रुपये प्रति लीटर होते.

याशिवाय मुंबईतील डिझेलच्या किंमतीत देखील घट झाली आहे. मुंबईत 15 मार्चला डिझेलचे दर 92.15 रुपये प्रति लीटर झाले आहेत. याच्या एक दिवस आधी म्हणजेच 14 मार्चला डिझेलचे दर 94.27 रुपये प्रति लीटर होते. शासकीय तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या किंमती जारी करते. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचे दर जवळजवळ दोन रुपयांनी खाली आले आहेत.

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती

  • मुंबई
    पेट्रोल - 104.21 रुपये प्रति लीटर, डिझेल - 92. 15 रुपये प्रति लीटर
  • औरंगाबाद
    पेट्रोल - 106.66 रुपये प्रति लीटर, डिझेल - 92. 14 रुपये प्रति लीटर
  • कोल्हापूर
    पेट्रोल - 104.84 रुपये प्रति लीटर, डिझेल - 91.37 रुपये प्रति लीटर
  • नागपूर
    पेट्रोल - 104.06 रुपये प्रति लीटर, डिझेल - 90.62 रुपये प्रति लीटर
  • पुणे
    पेट्रोल - 103.76 रुपये प्रति लीटर, डिझेल - 90.29 रुपये प्रति लीटर
  • ठाणे
    पेट्रोल - 104.41 रुपये प्रति लीटर, डिझेल - 92. 34 रुपये प्रति लीटर
  • नाशिक
    पेट्रोल - 104.78 रुपये प्रति लीटर, डिझेल - 91.29 रुपये प्रति लीटर
  • सोलापुर
    पेट्रोल - 104.79 रुपये प्रति लीटर, डिझेल - 91.32 रुपये प्रति लीटर
  • वर्धा
    पेट्रोल - 104.85 रुपये प्रति लीटर, डिझेल - 91.38 रुपये प्रति लीटर

पुढील महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता
डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती कमी होण्याची दीर्घकाळापासून अपेक्षा केली जात होती. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलच्या किंमती वेळोवेळी कमी झाल्याचे दिसून आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या दोन वर्षांमध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. आता पुन्हा आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इंधनाचे दर कमी करण्यात आले आहेत.

आणखी वाचा : 

Mumbai Railway Stations Name : मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांना मिळणार ही नवी नावे, महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

परिवहन विभागाच्या 187 इंटरसेप्टर वाहनांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

महाराष्ट्राला वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांचे मानले आभार, म्हणाले.…