सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात 10 वंदे भारत एक्सप्रेसचे वर्च्युअली उद्घाटन केले. यापैकी एक ट्रेन महाराष्ट्राला मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Vande Bharat Express : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वर्च्युअली आज (12 मार्च) गुजरात (Gujrat) येथून देशासाठी 10 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. यामुळे नागरिकांना वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून प्रवास करणे आरामदायी होण्यासह प्रवास सुखकर होणार आहे. अशातच मध्य प्रदेशासह महाराष्ट्रालाही एक वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटले की, पंतप्रधानांनी आज देशात 10 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. दहापैकी एक ट्रेन महाराष्ट्राला मिळाली आहे. सरकारच्या 'वन स्टेशन वन प्रोडक्ट' च्या संकल्पनेमुळे नऊ स्थानकांना फायदा होणार आहे. याशिवाय रोजगाराच्या संधी देखील वाढल्या जाणार आहेत. याआधी महाराष्ट्राला सात वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत." याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 85 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकापर्ण आणि भूमीपूजन झाले आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशाला चौथी वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे.

आणखी वाचा : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात 10 वंदे भारत एक्सप्रेसचे वर्च्युअली उद्घाटन

Viral Video : पुणे येथील रस्त्यांवर स्क्रू फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस, नागरिकांनी दिल्या संतप्त प्रतिक्रिया

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाशिममध्ये अनावरण (See Photos)