सार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai Railway Stations Name : महाराष्ट्र कॅबिनेटने मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. खरंतर आठ रेल्वे स्थानकांची नावे ब्रिटिशांच्या काळातील होती. याशिवाय कॅबिनेटने उत्तन (भाईंदर) आणि विरार (पालघर) दरम्यान सागरी सेतू उभारण्यासाठी मंजूरी दिली आहे.
पुढील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलली जाणार
- करी रोड - लालबाग स्थानक
- मुंबई सेंट्रल - नाना जगन्नाश शंकर शेठ स्थानक
- सॅण्डहस्ट रोड - डोंगरी स्थानक
- मरिन लाइन्स - मुंबा देवी स्थानक
- चर्नी रोड -गिरगाव स्थानक
- कॉटन ग्रीन - काळा चौकी स्थानक
- किंग्स सर्कल - तीर्थंकर पार्श्वनाथ स्थानक
- डॉकयार्ड स्थानक -माझगाव स्थानक
अहमदनगरचेही नाव बदलले जाणार
महाराष्ट्र सरकाराने मुंबईतील रेल्वे स्थाकांची नावे बदलण्यासह अहमदनगर जिल्ह्याचे देखील नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगरला राणी अहिल्याबाई होळकर यांच्या सन्मार्थ ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ नाव ठेवले जाणार आहे. याशिवाय महाराष्ट्र कॅबिनेटने जम्मू-काश्मीर येथील श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी अडीच एकर जमीन खरेदी करण्याला मंजूरी दिली आहे. यासाठीचे बजेटचा प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभेच्या आधीच्या बजेट सत्रात राज्यातील बजेटमध्ये यापूर्वी करण्यात आला होता.
दरम्यान, खासदार राहुल शेवाळे यांनी राज्य सरकारकडे किंग्स सर्कल रेल्वे स्थानकाचे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ करण्यासह मुंबईतील सात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार, मध्य मुंबईत जैन समुदायाने स्थानकाचे नाव बदलून श्रद्धेय जैन तीर्थंकर यांचे नाव ठेवण्यावर आनंद व्यक्त केला आहे. आगामी लोकसभा निवडणूक पाहता महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून काही मोठे निर्णय घेतले जात आहेत.
आणखी वाचा :
परिवहन विभागाच्या 187 इंटरसेप्टर वाहनांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण