परिवहन विभागाच्या 187 इंटरसेप्टर वाहनांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

| Published : Mar 13 2024, 04:23 PM IST

CM Eknath Shinde

सार

महाराष्ट्र शासन पहिल्या दिवसापासून अपघातमुक्त महाराष्ट्र करण्याचा विचार करत आहेत. अपघातमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जिल्हा स्तरावरील समितीच्या माध्यमातून अपघात प्रवण स्थळे कमी करावीत.

Maharashtra : महाराष्ट्र शासन पहिल्या दिवसापासून अपघातमुक्त महाराष्ट्र करण्याचा विचार करत आहेत. अपघातमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जिल्हा स्तरावरील समितीच्या माध्यमातून अपघात प्रवण स्थळे कमी करावीत. स्पीड गन, कृत्रिम बुद्धमत्ता या प्रगत तंत्रज्ञानाचा आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणालीमध्ये उपयोग करून अपघातमुक्त महाराष्ट्र करावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज (13 मार्च) केले.

नरिमन पाँईट (Nariman Point) येथे परिवहन विभागाच्या 187 इंटरसेप्टर वाहनांना हिरवा झेंडा दाखवून या वाहनांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Vasant Kesarkar),परिवहन आयुक्त विवेक भीमनवार (Vivek Bhimanwar) यांनी उपस्थिती लावली होती.

 

इंटरसेप्टर वाहनांमुळे रस्ता सुरक्षा अधिक सक्षम होणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, अपघात मुक्त राज्य करण्यासाठी शासनाकडून विभागाला पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळेस होणारे अपघात टाळण्यासाठी प्रत्येक नाक्यांवर वाहन चालकांची तपासणी करावी, चालकांना जागृत करावे, रम्बलर लावावे, चालकाने जास्त कालावधीसाठी सतत वाहन चालवू नये, अशा बाबींवर जनजागृती करून अपघात नियंत्रणात आणावेत. विभागातील अधिकाऱ्यांनी यासाठी जनजागृती करावी, कार्यशाळा घेण्यात याव्यात. अपघात कमी करून नागरिकांचे जीव वाचविले पाहिजे. एक जीव वाचला, तर एक कुटुंब वाचते. अपघात नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना कराव्यात, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

प्रास्ताविकामध्ये परिवहन आयुक्त श्री. भिमनवार यांनी रस्ता सुरक्षेविषयी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. कार्यक्रमावेळी इंटर सेप्टर वाहनांचे निरीक्षण मुख्यमंत्र्यांनी केले. या आधुनिक सुविधांयुक्त वाहनांची पूर्ण माहिती घेतली. पहिल्या इंटर सेप्टर वाहनाचे सारथ्य महिला चालक मोनिका साळुंखे यांनी केले. ही वाहने राज्यातील परिवहन कार्यालयांना देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अधिकारी, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनचे पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली होती.

 

आणखी वाचा : 

Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्रात NDA मधील पक्षांमध्ये सीट शेअरिंगचा फॉर्म्युला ठरला, जाणून घ्या कोणत्या चेहऱ्यांना मिळणार संधी

Maharashtra : शासकीय कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे बंधनकारक असणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे निमंत्रण नाकारले, वाचा नक्की काय आहे कारण