MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Hadapsar Railway Station: पुणेकरांची 'लाईफलाईन' सुसाट! हडपसर रेल्वे स्थानकाचा कायापालट; आता चौथ्या प्लॅटफॉर्मला ग्रीन सिग्नल!

Hadapsar Railway Station: पुणेकरांची 'लाईफलाईन' सुसाट! हडपसर रेल्वे स्थानकाचा कायापालट; आता चौथ्या प्लॅटफॉर्मला ग्रीन सिग्नल!

Hadapsar Railway Station: पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी हडपसर स्टेशनवर चौथ्या फलाटाला मंजुरी मिळाली, ज्यामुळे ते महत्त्वाचे सॅटेलाइट टर्मिनल बनेल. यामुळे हडपसर, खराडी, वाघोली परिसरातील नागरिकांना लांब पल्ल्याच्या गाड्या पकडणे सोपे होणारय

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 15 2026, 04:30 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
पुणेकरांची 'लाईफलाईन' सुसाट! हडपसर रेल्वे स्थानकाचा कायापालट
Image Credit : Asianet News

पुणेकरांची 'लाईफलाईन' सुसाट! हडपसर रेल्वे स्थानकाचा कायापालट

पुणे: पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा वाढता ताण कमी करण्यासाठी 'सॅटेलाइट टर्मिनल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हडपसर रेल्वे स्थानकाच्या विस्ताराला आता मोठी गती मिळाली आहे. रेल्वे बोर्डाने हडपसर स्थानकावर चौथ्या फलाटाच्या (Platform No. 4) बांधकामाला अधिकृत मंजुरी दिली असून, यामुळे पूर्व पुण्यातील दळणवळणाचे चित्र पालटणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
पुणे स्टेशनला जाण्याची कटकट संपणार!
Image Credit : our own

पुणे स्टेशनला जाण्याची कटकट संपणार!

हडपसर रेल्वे स्थानकाचा विस्तार झाल्यामुळे हडपसर, मांजरी, वाघोली, खराडी आणि मगरपट्टा सिटी या परिसरातील नागरिकांना आता लांब पल्ल्याच्या गाड्या पकडण्यासाठी मुख्य पुणे स्टेशनच्या गर्दीत जाण्याची गरज भासणार नाही. विशेषतः आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या हजारो तरुण प्रोफेशनलसाठी हे टर्मिनल वरदान ठरणार आहे. 

Related Articles

Related image1
Ration Card: रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; जूनपर्यंतचे धान्य आता मिळणार 'अॅडव्हान्स'मध्ये
Related image2
Kumbha Mela 2027 : कुंभमेळ्यात हिंदूंव्यतिरिक्त कुणी स्टॉल लावला तर उखडून टाका; नितेश राणे यांचे वक्तव्य चर्चेत
34
नव्या फलाटाचे गणित आणि रेल्वेचा मास्टरप्लॅन
Image Credit : social media

नव्या फलाटाचे गणित आणि रेल्वेचा मास्टरप्लॅन

नव्या गाड्यांची सोय: एक अतिरिक्त फलाट वाढल्यामुळे या स्थानकावरून दररोज किमान ३ ते ४ नवीन गाड्या सोडणे किंवा थांबवणे रेल्वे प्रशासनाला शक्य होणार आहे.

प्रचंड क्षमता: सध्या या स्थानकावरून दररोज ४ हजार प्रवासी प्रवास करतात, नव्या विस्तारानंतर ही संख्या दुप्पट होऊ शकते.

६५० मीटरचा आग्रह: रेल्वे बोर्डाने सध्या ४०० मीटर लांबीच्या (१४ डबे) फलाटाला मंजुरी दिली असली, तरी प्रशासन २४ डब्यांच्या मोठ्या गाड्यांसाठी ६५० मीटर लांबीच्या फलाटासाठी आग्रही आहे.

७ कोटींचा खर्च: या संपूर्ण प्रकल्पासाठी साधारण ७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, लवकरच याची निविदा प्रक्रिया (Tenders) सुरू होणार आहे. 

44
प्रशासनाची भूमिका
Image Credit : iSTOCK

प्रशासनाची भूमिका

रेल्वे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विस्तारामुळे हडपसर स्थानकाची कार्यक्षमता वाढणार आहे. तांत्रिक अडथळे दूर झाल्यामुळे भविष्यात येथून अधिक रेल्वे गाड्या सुरू करणे सोपे होईल, ज्याचा थेट फायदा पुणेकरांना होईल.

पुण्याच्या पूर्व भागाचा विकास पाहता, हडपसर टर्मिनल हे आगामी काळात पुण्याचे 'दुसरे मुख्य रेल्वे केंद्र' म्हणून उभे राहील, यात शंका नाही!

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
पुण्याच्या बातम्या

Recommended Stories
Recommended image1
तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत का नाही, पत्रकार परिषदेत काय केला खुलासा?
Recommended image2
Maratha Reservation Agitation : ‘सरकारकडून वारंवार विश्वासघात’; मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल, नव्या आंदोलनाचे संकेत
Recommended image3
Missing Link Accident : मिसिंग लिंक पुन्हा चर्चेत; बसची तीन वाहनांना जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
Recommended image4
लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले पैसे, एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा
Recommended image5
तटकरे आणि पटेल यांना कार्यकारणीतून वगळले, सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाने बसला सर्वांना धक्का
Related Stories
Recommended image1
Ration Card: रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; जूनपर्यंतचे धान्य आता मिळणार 'अॅडव्हान्स'मध्ये
Recommended image2
Kumbha Mela 2027 : कुंभमेळ्यात हिंदूंव्यतिरिक्त कुणी स्टॉल लावला तर उखडून टाका; नितेश राणे यांचे वक्तव्य चर्चेत
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved