मुंबई : महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला १,५०० रुपये सन्मान निधी म्हणून दिला जातो. परंतु, जुलै महिना संपला तरी अद्याप हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. पण आता मंत्री अदिती तटकरे यांनी तारीख जाहीर केली आहे.
केंद्र सरकार जुलै अखेर किंवा लवकरच पीएम-किसान योजनेच्या २० व्या हप्त्याची घोषणा करणार आहे. २ ऑगस्ट रोजी २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील. e-KYC आणि आधार-बँक लिंक असणे आवश्यक आहे.
नागपूरच्या १९ वर्षीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने FIDE Women’s World Chess Cup 2025 जिंकल्यानंतर नागपूर शहरात तिचे भव्य स्वागत करण्यात आले. या विजयामुळे ती भारतातील पहिली महिला चेस वर्ल्ड कप विजेती बनली आहे.
हिंजवडीतील विकासकामांवरून ग्रामस्थ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. गावात पायाभूत सुविधांचा अभाव असून, केवळ आयटी कंपन्यांना प्राधान्य दिलं जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
पुण्यातील दौंडजवळच्या यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्यावरून दोन गटांमध्ये भांडण झाले. फेसबुकवरील पोस्टमुळे वाढलेल्या तणावातून दुकाने, घरे आणि धर्मस्थळांवर हल्ले झाले.
मुंबईत स्वयंपाक करणाऱ्या महिला महिन्याला लाखो रुपये कमावतात अशी एका वकिलाची पोस्ट व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे त्या फक्त अर्धा तास काम करून १८,००० रुपये पगार घेतात, असे समोर आले आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात 1 ऑगस्ट 2025 रोजी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
पुण्यातील औंधमधील वर्दळीच्या राहुल हॉटेलसमोर रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळल्यामुळे वृद्ध खाली पडला आणि त्याचवेळी मागून आलेल्या कारने त्याला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याला विरोध केला आहे. यापूर्वी त्यांनी कर्नाटक सरकारलाही पत्र लिहिले होते.
राज्यात सध्या पावसाची तीव्रता कमी झाली असून बहुतांश भागांत ढगाळ वातावरणासह केवळ हलक्याफुलक्या सरी कोसळत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हीच परिस्थिती पुढील पाच दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
Maharashtra